Join us
Daily Top 2Weekly Top 5

"पाकिस्तानी खेळाडूला पैसा देत असेल तर ती.." गावसकरांनी IPL चा दाखला देत काव्या मारनला सुनावलं

पाकिस्तानी खेळाडूला पैसा द्यायलाच नाही पाहिजे, गावसकरांचे स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 16:57 IST

Open in App

इंग्लंडमधील ‘द हंड्रेड’ क्रिकेट लीग स्पर्धेतील लिलावात काव्या मारनच्या सह मालकीच्या सनरायझर्स लीड्स (Sunrisers Leeds) संघाने पाकिस्तानी खेळाडूवर बोली लावली. त्यानंतर भारतीयांमध्ये संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळाले. IPL दरम्यान जो चेहरा नॅशनल क्रशच्या रुपात केंद्रस्थानी असतो त्या काव्या मारनला ट्रोलचा सामना करावा लागला. सनरायझर्स संघाने पाकिस्तानी फिरकीपटू अबरार अहमदवर बोली लावल्यावर भारतीयांना राग येणं स्वाभाविक आहे, असे म्हणत आता लिटल मास्टर सुनील गावसकर यांनीही सनरायझर्स संघ व्यवस्थापनासह काव्या मारनवर निशाणा साधला आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

पाकिस्तानी खेळाडूला पैसा द्यायलाच नाही पाहिजे, गावसकरांचे स्पष्ट मत भारताचे दिग्गज फलंदाज आणि सध्याच्या घडीला समालोचकाच्या रुपात क्रिकेटशी कनेक्ट असलेल्या सुनील गावसकर यांनी 'मिड डे'ला लिहिलेल्या स्तंभ लेखातून काव्या मारनच्या सह मालकीच्या सनरायझर्स संघावर कठोर शब्दांत टीका केली. ‘द हंड्रेड’मध्ये भारतीय मालक असलेल्या फ्रेंचायझीकडून पाकिस्तानी खेळाडूची खरेदी झाल्यानंतर निर्माण झालेला वाद आश्चर्यकारक नाही. नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवाही हल्ल्यानंतर भारतीय फ्रेंचायझींनी पाकिस्तानी खेळाडूंना IPL पासून दूर ठेवले. पाकिस्तानी खेळाडूंना मिळणाऱ्या मानधनावर ते त्यांच्या सरकारला कर भरतात आणि त्या पैशातून शस्त्रसाठा केला जाऊ शकतो.  ही गोष्ट लक्षात घेऊन पाकिस्तानी कलाकार आणि खेळाडूंवर बंदी घालण्यात आली आहे. 

काव्या मारनच्या अडचणीत वाढ! पाकिस्तानच्या अबरार अहमदला संघात घेताच 'सनरायजर्स'वर मोठी कारवाई

गावसकरांचा कठोर शब्दांत काव्या मारनला सुनावलं 

गावस्कर यांनी पुढे असेही म्हटले आहे की, भारतीय मालकीची संस्था किंवा तिची परदेशातील शाखा जर अशा प्रकारे पाकिस्तानी खेळाडूला पैसा देत असेल तर ती अप्रत्यक्षपणे भारतीयांच्या जीवितहानीत योगदान देत आहे. संघाचे प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरी न्यूझीलंडचे असल्याने त्यांना या संवेदनशील बाबींची पूर्ण जाणीव नसावी; मात्र मालकांनी परिस्थिती समजून निर्णय घ्यायला हवा होता, असे म्हणत गावसकरांनी नाव न घेता काव्या मारनचे कान टोचले आहेत. 

पाक खेळाडूला ताफ्यात घेण्यासंदर्भात कोचनं मांडली होती भूमिका

काव्या मारनच्या सह मालकीच्या सनरायझर्स लीड्स संघाने ‘द हंड्रेड’च्या लिलावात अबरार अहमदला जवळपास २.३४ कोटी रुपयांसह आपल्या संघात सामील करून घेतले. फ्रँचायझी संघाचे प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरी यांनी इंग्लंडचा आदिल रशीद हा पहली पसंती होता. पण  तो हाती न लागल्यामुळे उर्वरित चार पर्यायांपैकी सर्वोत्तम पर्याय निवडत पाकिस्तानी खेळाडूवर बोली लावली, असे  स्पष्टीकरण दिले होते.  

 

English
हिंदी सारांश
Web Title : Gavaskar criticizes Kavya Maran for Sunrisers' Pakistani player acquisition.

Web Summary : Sunil Gavaskar slammed Sunrisers Leeds, co-owned by Kavya Maran, for buying Pakistani player Abrar Ahmed in 'The Hundred'. Gavaskar suggested this indirectly supports activities detrimental to India, questioning the decision and awareness of the team owners.
टॅग्स :सुनील गावसकरकाव्या मारनभारत विरुद्ध पाकिस्तान