Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिलेशनशिपमध्ये होती Mithali Raj; लग्नाच्या बोलणीचा किस्सा अन् ती सिंगल राहण्यामागची स्टोरी

प्रेमाच्या आणाभाका न मारता रंगला होता डेटिंगचा खेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 12:18 IST

Open in App

Mithali Raj Talks About Her Dating Life : भारतीय महिला क्रिकेटमध्येच नाही तर महिला क्रिकेट जगतात राज्य करणारा चेहरा म्हणून मिताली राजकडे पाहिले जाते. तिने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक खास विक्रमाला गवसणी घातली आहे. मितालीच्या क्रिकेटच्या मैदानातील कामगिरीशिवाय वैयक्तिक आयुष्यातील गोष्टीही चर्चेचा विषय राहिल्या आहेत. खुद्द मिताालीनं एका पॉडकास्ट शोमध्ये तिच्या आयुष्यातील खास किस्से अगदी मनमोकळेपणाने सांगितले आहेत. ज्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगताना दिसते. 

मितालीनं दिलखुलास गप्पा गोष्टी करत शेअर केले खास किस्से

क्रिकेट हा खेळच आपला जीवनसाथी असल्याचे मानणाऱ्या मिताली राजनं एका पॉडकास्ट शोमध्ये एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते, अशी कबुली दिली. एवढेच नव्हे तर नात्यात राहूनही लग्न न करण्यागागची स्टोरीही तिने शेअर केली आहे. मितालीनं लग्न आणि डेटिंगसंदर्भातील गोष्टींवर दिलखुलास गप्पा मारताना सध्याच्या घडीला सिंगल असल्याचे सांगितले. मी माझ्या आयुष्यात क्रिकेटला नेहमीच पहिली पसंती दिलीये, या वाक्यवरही तिने जोर दिला.

नो कमिटमेंट रुल सह रंगला होता डेटिंगचा खेळ

डेटिंगसंदर्भात मिताली म्हणाली की, एकेकाळी मी डेट करत होते. एका कॉमन फ्रेंड्सच्या माध्यमातून मी त्याला भेटले होते. मग आम्ही दोघांनी एकमेकांना नंबर शेअर केला. आपल्या या नात्यात कोणतेच कमिटमेंट नसेल, हे आधीच स्पष्ट केल्याचा किस्साही तिने यावेळी सांगितला. कारण माझं पहिलं प्राधान्य हे क्रिकेट आणि खेळ हेच होते. त्यावेळी मी भारतीय संघाची कॅप्टन होते, असे ती म्हणाली. 

लग्नाच्या बोलणीसंदर्भातील किस्सा तर थक्क करून सोडणारा

यावेळी मिताली राजला लग्नाची बोलणी करण्यासंदर्भात कधी कुणाला भेटलीस का? असा प्रश्नही विचारण्यात आला होता. यावर ठरवून कधी भटले नाही, असे सांगताने तिने कॉलवर लग्नासंदर्भातील बोलणी व्हायची, असे सांगितले. यावेळी आलेला एक भयावह अनुभवही तिने शेअर केला. लग्नाच्या बोलणीसाठी एका व्यक्तीने कॉल केला त्यावेळी सुरुवातीला त्याने एकदम सामान्य गप्पा गोष्टी केल्या. त्यानंतर मुलं किती हवी? क्रिकेट सोडणार का? लग्नानंतर कुटुंबियांतील अन्य मंडळींसोबत मुलाबाळांची देखभाल करावी लागेल. अशा गोष्टी सुरु केल्या. हे ऐकून धक्काच बसला होता. माझ्या आई वडिलांनी नेहमी खेळासाठी प्रोत्साहित केले होते. मी कोणत्याही परिस्थितीत क्रिकेटला सोडणार नव्हते, असे तिने सांगितले.

टॅग्स :मिताली राजऑफ द फिल्डमहिला