Join us

रोहित शर्मा, रिषभ पंत आदींचे मेलबर्न रेस्टॉरंटमधील ६,६८३ रुपयांचे बिल चाहत्याने भरले!

भारतात क्रिकेट हा धर्म आहे... देशातील प्रत्येक नागरिक हा क्रिकेटवेडा आहे. त्यामुळे क्रिकेटपटूंची एक झलक पाहण्यासाठी लोकं काय करतील याचा नेम नाही

By स्वदेश घाणेकर | Updated: January 2, 2021 10:03 IST

Open in App

टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे आणि तेथेही भारतीय चाहते मोठ्या संख्येनं आहेत. मेलबर्नच्या एका रेस्टॉरंटमध्ये रोहित शर्मा, रिषभ पंत, नवदीप सैनी व शुबमन गिल हे जेवण्यासाठी गेले होते आणि त्याचवेळी त्यांच्या शेजारी बसलेल्या भारतीय चाहत्यानं त्यांचा व्हिडीओ टिपून सोशल मीडियावर पोस्ट केला.  

नवलदीप सिंग असे या चाहत्याचे नाव असून त्यानं रोहित, रिषभ, नवदीप व शुबमन यांचे ११८.६९ ऑस्ट्रेलियन डॉलर ( ६,६८३ रुपये) इतकं बिल भरल्याचा दावा केला आहे. त्यानं बिलाचा फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.  भारतीय खेळाडूंना जेव्हा हे समजलं, तेव्हा रोहितनं त्याला पैसे घेण्याची विनंती केली. असाही दावा नवलदीपनं केला.  

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्मारिषभ पंतशुभमन गिल