Join us  

सुरेश रैनानं Amsterdam येथे सुरू केलं रेस्ट्रॉरंट, भारतीय पदार्थांची चव युरोपच्या हृदयापर्यंत पोहोचवणार

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना याने ॲमस्टरडॅम येथे Raina Indian Restaurant ची सुरुवात केली. सोशल मीडियावर त्याने काही फोटो शेअर करून चाहत्यांना या नव्या इनिंग्जची माहिती दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 2:17 PM

Open in App

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना याने ॲमस्टरडॅम येथे Raina Indian Restaurant ची सुरुवात केली. सोशल मीडियावर त्याने काही फोटो शेअर करून चाहत्यांना या नव्या इनिंग्जची माहिती दिली. १५ ऑगस्ट २०२० मध्ये महेंद्रसिंग धोनीपाठोपाठ रैनानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. सुरेश रैनाने भारतासाठी २२६ वन डे सामने खेळला आहे, ज्यात त्याने ५ शतकांसह ५६१५ धावा केल्या आहेत. सुरेश रैनाने १८ कसोटी सामन्यांत एका शतकासह ७६८ धावा, तर ७८ ट्वेंटी-२० सामन्यांत १६०४ धावा केल्या आहेत. रैनाने भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावले आहे. 

Mr. IPL रैनाने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये अधिक काळ चेन्नई सुपर किंग्सचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने २०५ सामन्यांत ५५२८ धावा केल्या. त्यात १ शतक व ३९ अर्धशतकांचा समावेश आहे. रैनाने ट्विट केलं की,''ॲमस्टरडॅममधील रैना इंडियन रेस्टॉरंटची ओळख करून देताना मी खूप आनंदी आहे. जिथे जेवण आणि स्वयंपाकाची माझी आवड केंद्रस्थानी आहे! गेल्या काही वर्षांमध्ये तुम्ही माझे खाद्यपदार्थावरील प्रेम पाहिले आहे आणि माझ्या पाककृतीचे साक्षीदार झाला आहात. आता मी भारताच्या विविध भागांतील अस्सल चव थेट युरोपच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याच्या मोहिमेवर आहे. या विलक्षण प्रवासात माझ्यासोबत सामील व्हा, कारण आम्ही एकत्र एका चवदार प्रवासाला सुरुवात करत आहोत.  #RainaAmsterdam #CulinaryAdventure #PrideOfIndianFlavors''

टॅग्स :सुरेश रैनाभारतीय क्रिकेट संघ
Open in App