भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण ( Irfan Pathan) याने आज केलेल्या ट्विटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. अनेकांनी त्याच्या या ट्विटचा संबंध कर्नाटक येथे सुरू असलेल्ये हिजाब वादाशी ( karnataka hijab controversy) जोडला. त्याला क्रिकेटच्या विश्वातून बाहेर पडून आजूबाजूला काय घडतंय, हे पाहण्याचा सल्लाही दिला गेला. इरफाननं त्याच्या ट्विटमध्ये निवडणुका होणार आहेत का? असा प्रश्न विचारला. त्यावर एका युजरने त्याला तुझा मित्र गौतम गंभीर याला विचार, असेही म्हटले.
इरफानने बुधवारी सकाळी १० वाजता ट्विट केले आणि काही वेळातच त्याच्यावर नेटिझन्सनी हल्लाबोल केला. अनेकांनी त्याच्या या ट्विटचा संबंध कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाब वादाशी जोडला.
2016मध्ये झाले होते लग्नइरफानने 2016 मध्ये दुबईतील प्रसिद्ध व्यवसायिक मिर्जा फारूख बेग यांची मुलगी सफा बेग हिच्याशी लग्न केले होते. त्या दोघांचे लग्न अतिशय कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत 4 फेब्रुवारी 2016 मध्ये सौदी अरेबियातील पवित्र शहर असलेल्या मक्कामध्ये झाला होता. 19 डिसेंबरला 2016 त्यांनी पहिल्या मुलाला जन्म दिला. त्यानंतर सफा यांनी आज त्यांच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. इरफानच्या पहिल्या मुलाचे नाव इम्रान असून, दुसऱ्या मुलाचे नाव सुलेमान ठेवले आहे.