बाप-लेकाची ताटातूट! दु:ख विसरून गब्बरनं धरला ठेका; नववर्षाचं केलं दणक्यात स्वागत

सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 02:25 PM2024-01-02T14:25:23+5:302024-01-02T14:28:35+5:30

whatsapp join usJoin us
Indian cricketer shikhar dhawan clelebrate new year with fans giving warm wishes in paris video goes viral on social media  | बाप-लेकाची ताटातूट! दु:ख विसरून गब्बरनं धरला ठेका; नववर्षाचं केलं दणक्यात स्वागत

बाप-लेकाची ताटातूट! दु:ख विसरून गब्बरनं धरला ठेका; नववर्षाचं केलं दणक्यात स्वागत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Shikhar Dhwan Video : सध्या सर्वत्र नववर्षाच्या स्वागताचा उत्साह आहे. सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. कलाविश्वातील मंडळींपासून ते क्रिकेट जगतातील शिलेदारांनी नव्या वर्षाचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. त्याचे व्हिडीओज, पोस्ट चाहत्यांसोबत शेअर करत त्यांनी नव्या वर्षाचा आनंद द्विगुणीत केला. अशातच भारताचा स्टार क्रिकेटपटू शिखर धवनने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत आला आहे. अनोख्या ढंगात चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत शिखर धवनने नेटकऱ्यांची मनं जिंकली.    

शांत, संयमी म्हणून ओळख असलेला धवन मागील मोठ्या कालावधीपासून क्रिकेटपासून दूर आहे. पण, चाहत्यांचा लाडका गब्बर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या संपर्कात असतो. शिखर धवनची लोकप्रियता इतर खेळाडूंपेक्षा काही कमी नाही. कौंटुबिक कलह, वाद अन् घटस्फोट अशा कारणांमुळे तो नेहमी चर्चेत राहिला. तसेच निराशेच्या गर्तेत सापडलेल्या धवनने या विवंचनेत असताना या व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या भावनांना मोकळीक दिली आहे. आपल्या चाहत्यावर्गाला नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना त्याने पॅरिसमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

दु:ख विसरून गब्बरनं धरला ठेका :

शिखर धवन मागील काही महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानात दिसला नाही. खरं तर शिखर आता थेट आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता आहे. अलीकडेच त्याने त्याच्या लेकाच्या वाढदिवशी एक भावनिक पोस्ट केली होती. बाप-लेकाची ताटातूट पाहून नेटकऱ्यांसह अभिनेता अक्षय कुमारही भावूक झाला होता. आता तो थेट आगामी आयपीएल हंगामात दिसेल. सध्या गब्बर पॅरीसमध्ये असून त्याने तिथून रिल्स शेअर करत चाहत्यांना इफेल टॉवरची झलक दाखवली. 

पाहा व्हिडीओ -

दरम्यान, शिखर धवन त्याच्या वैयक्तिक जीवनामुळे नेहमी चर्चेत असतो. शिखर आणि त्याच्या पत्नीचे नाते फार काळ टिकले नाही आणि त्यांनी एकमेकांपासून दूर होण्याचा निर्णय घेतला. अलीकडेच दिल्लीतील एका कौटुंबिक न्यायालयाने धवनचा त्याची विभक्त पत्नी आयशा मुखर्जीपासून घटस्फोट मंजूर केला. न्यायाधीश हरीश कुमार यांनी धवनने आपल्या पत्नीविरुद्ध घटस्फोटाच्या अर्जात केलेले सर्व आरोप या आधारावर मान्य केले की पत्नी आयशा मुखर्जी स्वतःचा बचाव करण्यात अपयशी ठरली. आयशाने धवनला त्याच्या एकुलत्या एक मुलापासून वर्षानुवर्षे वेगळे राहण्यास भाग पाडून मानसिक त्रास दिल्याचे न्यायाधीशांनी सांगितले. सध्या धवनचा मुलगा झोहा त्याच्यापासून दूर आहे. याचाच दाखला देत शिखरने लेकाच्या वाढदिवशी व्हिडीओ कॉलचा स्क्रीनशॉट शेअर करून भावनिक पोस्ट केली होती.

Web Title: Indian cricketer shikhar dhawan clelebrate new year with fans giving warm wishes in paris video goes viral on social media 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.