Sanjay Bangar Transgender Anaya Bangar: टीम इंडियाचा माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर याच्या मुलाने इंग्लंडमध्ये लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया करून घेतल्याची बातमी काही महिन्यांपूर्वीच आली होती. तो मुलीमध्ये रूपांतरित झाला. लिंग बदलण्यासोबतच नावही बदलले. आधी तो आर्यन बांगर होता, पण आता ती अनया बांगर म्हणून ओळखली जाते. अनया बांगर लिंग बदलल्यानंतर पहिल्यांदाच भारतात पोहोचली आणि इथे येताच तिचा लूक बदललेला दिसला. तिने आपल्या केसांना एक नवीन स्टाईलिंगही केली.
भारतात येताच हेअरस्टाईल, लूक सगळं बदललं...
भारतात पोहोचल्यानंतर अनया बांगर सलॉनमध्ये गेली. तिने तिचा नवीन मेकओव्हर केला. जेव्हा ती भारतात पोहोचली होती तेव्हा विमानतळावर तिचे केस कुरळे दिसले होते. पण नव्याने समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तिची केसांची स्टाइल बदलली आहे.
भारतात पोहोचल्यानंतर तिने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अनन्या बांगरने केस सरळ म्हणजेच हेअर स्ट्रेटनिंग केल्याचे दिसले.
लिंगबदल प्रक्रियेचा प्रवास कठीण होता...
अनया बांगर इंग्लंडमधील मँचेस्टरमध्ये राहते आणि सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. अलीकडेच, तिने सोशल मीडियावर तिच्या लिंग परिवर्तनाच्या प्रवासाचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. तिची हार्मोनल रिप्लेसमेंट सर्जरी झाली असून ती सर्वार्थाने मुलीसारखी होत असल्याचे तिने सांगितले आहे.
अनया एक क्रिकेटपटू
अनया बांगर तिच्या वडिलांप्रमाणेच एक क्रिकेटपटू आहे आणि तिने इंग्लंडमधील अनेक स्थानिक आणि काउंटी क्लबसाठी क्रिकेट खेळले आहे. तिने भारतात यशस्वी जैस्वालसोबतही क्रिकेट खेळले आहे. अनया जेव्हा मुलगा होती, तेव्हा ती यशस्वीसोबत मुंबईकडून १६ वर्षांखालील संघात क्रिकेट खेळायची. तिने काही काळापूर्वी सोशल मीडियाद्वारे भारतात येण्याची माहिती शेअर केली होती. तिने लिहिले होते की ती खूप दिवसांनी भारतात येणार आहे आणि ती त्यासाठी उत्साही आहे. आता ती भारतात, मुंबईत आली आहे.
Web Title: Indian Cricketer Sanjay Bangar transgender son Aryan Bangar became girl Anaya Bangar look change new hairstyle when returned to India from UK England watch video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.