Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात

देशातील सर्वात महागड्या हॉटेलात थाटात पार पडला कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 17:00 IST2025-06-08T16:20:13+5:302025-06-08T17:00:28+5:30

whatsapp join usJoin us
Indian Cricketer Rinku Singh MLA Priya Saroj Engagement At Hotel Centrum Lucknow One Of Most Of Expensive Hotel In Country Know Price Of One Dish | Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात

Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय टी-२० क्रिकेट संघातील स्टार क्रिकेटर रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांच्या साखरपुड्याचा कार्यक्रम लखनौमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये अगदी थाटात पार पडला. या कार्यक्रमासाठी बॉलिवूडसह क्रिकेट आणि राजकिय क्षेत्रातील लोकप्रिय मंडळींनी हजेर लावल्याचे पाहायला मिळाले. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे पत्नी डिंपल यादव यांच्यासह सहभागी झाले होते. याशिवाय बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

देशातील सर्वात महागड्या हॉटेलात थाटात पार पडला कार्यक्रम

रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांचा साखरपुडा ज्या हॉटेलमध्ये पार पडला ते द सेंट्रम फाइव्ह स्टार हॉटेल देशातील सर्वात महागड्या हॉटेलपैकी एक आहे. आयपीएलमधील लखनौच्या मैदानातील सामने खेळण्यासाठी आलेल्या IPL फ्रँचायझी संघातील खेळाडूंचा मुक्काम हा देखील याच अलिशान हॉटलमध्ये असायचा.  

Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ

या पंचतारांकित हॉटेलमधील एका डिशची किंमत किती?

वेगवेगळ्या रिपोर्टनुसार, लखनौमधील हॉटेल द सेंट्रममध्ये एखादा खास कार्यक्रमासाठीचा खर्च हा पाहुण्यांची संख्या आणि काय सेवा घेणार यावर ठरतो. सामान्यत: रेस्तराँ पार्टी हॉलचे बजेट हे १ ते १ लाख ५० हजारच्या दरम्यान असून मोठ्या हॉलसाठी ही रक्कम १ लाख १५ लाखांच्या घरात जाते. या हॉटेलमधील सर्वात कमी बजेटच्या डिशची किंमत साधारणता ५ ते ६ हजार रुपयांच्या घरात आहे.

मोजकी मंडळी अन् महागडा पाहुणचार 

रिंकू सिंह याने सामान्य घरातून येऊन क्रिकेटच्या मैदानात छाप सोडत मोठी संपत्ती कमावलीये. आयपीएल २०२५ च्या हंगामात शाहरुखच्या कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने त्याला १६ कोटी रुपयांसह रिटेन केले होते. दुसरीकडे त्याची होणारी पत्नी प्रिया सरोज ही खासदार आहे. दोघांनी या खास क्षणी मोजक्या ३०० मंडळींना आमंत्रित केले असले तरी महागड्या पाहुणचाराचा खास बेत आखल्याची गोष्टही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. 
 

Web Title: Indian Cricketer Rinku Singh MLA Priya Saroj Engagement At Hotel Centrum Lucknow One Of Most Of Expensive Hotel In Country Know Price Of One Dish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.