लग्नाची चर्चा रंगत असताना क्रिकेटरची महागडी शॉपिंग! खास व्यक्तीसाठी लाखो रुपयांचं गिफ्ट

क्रिकेटर रिंकू सिंह फिल्ड बाहेरील गोष्टींमुळे चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 12:48 IST2025-01-21T12:43:18+5:302025-01-21T12:48:23+5:30

whatsapp join usJoin us
Indian Cricketer Rinku Singh Gifted A Dream Super Bike To His Father Know Price And More | लग्नाची चर्चा रंगत असताना क्रिकेटरची महागडी शॉपिंग! खास व्यक्तीसाठी लाखो रुपयांचं गिफ्ट

लग्नाची चर्चा रंगत असताना क्रिकेटरची महागडी शॉपिंग! खास व्यक्तीसाठी लाखो रुपयांचं गिफ्ट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Rinku Singh Gifts Super Bike To His Father Know Price : भारतीय क्रिकेट संघातील नवा मॅच फिनिशर रिंकू सिंह सध्या फिल्ड बाहेरील गोष्टींमुळे चर्चेत आहे. IPL मध्ये शाहरुखच्या संघाकडून धमाकेदार खेळीसह लक्षवेधून टीम इंडियात एन्ट्री केलेल्या रिंकूची फिल्डबाहेरही हवा दिसून येते. एका बाजूला इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी तो सज्ज असताना दुसऱ्या बाजूला तो लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. उत्तर प्रदेशच्या खासदर प्रिया सरोज यांच्यासोबत त्याचं लग्न ठरलं आहे. वधूच्या वडिलांनीच दोन्ही कुटुंबियातील मंडळी या लग्नासाठी तयार असल्याची माहिती दिलीये. 

लग्नाआधी महागडी शॉपिंग, खास व्यक्तीसाठी लाखो रुपयांचं गिफ्ट

त्यात आता क्रिकेटर लग्नाआधीच्या महागड्या शॉपिंगमुळे चर्चेत आलाय. रिंकू सिंहनं आपल्या आयुष्यातील खास व्यक्तीसाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. त्याने आपल्या वडिलांसाठी सुपर बाईक खरेदी केलीये.रिंकू सिंह याचा बाईकसंदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात रिंकूचे वडील खानचंदर नव्या बाईकवरुन फेरफटका मारताना पाहायला मिळते.


हालाकीच्या परिस्थितीतून यशाच्या शिखरावर पोहचलेला क्रिकेटर

क्रिकेटर रिंकू सिंह याने वडिलांना गिफ्ट देण्यासाठी जी बाईक खरेदी केलीये ती कावसकी निंजा बाईक आहे. या सुपर बाईकची किंमत जवळपास ३ ते ५ लाख रुपयांच्या घरात आहे. रिंकू आज क्रिकेटच्या जोरावर लाखो रुपये कमावतोय. पण फार कमी लोकांना माहिती असेल की, तो खूप मध्यमवर्गीय कुटुंबातून आला आहे. त्याचे वडील घरोघरी सिलेंडर पोहचव्याचे काम करायचे. कठोर मेहनतीच्या जोरावर रिंकून यशाच शिखर गाठलंय. आता त्याने वडिलांवरील प्रेम व्यक्त करताना त्यांना सुपर बाईक गिफ्ट केलीये.  

रिंकू सिंहची खासियत

आयपीएलमध्ये जलवा दाखवून दिल्यावर रिंकू सिंहला टीम इंडियात एन्ट्री मिळाली आहे. टी-२० क्रिकेटमधील तो सुपरस्टार झालाय.  कठीण परिस्थितीत अडकेला सामना एकट्याच्या जोरावर फिरवण्याची ताकद रिंकू सिंहमध्ये आहे. त्यानं एकदा दोनदा नव्हे तर सातत्याने त्याच्यातील ही क्षमता दाखवून दिली आहे. हीच गोष्ट त्याला सर्वोत्तम फिनिशिर ठरवते.

Web Title: Indian Cricketer Rinku Singh Gifted A Dream Super Bike To His Father Know Price And More

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.