Indian Cricketer Rinku Singh Get Engaged To MP Priya Saroj In Lucknow : भारतीय क्रिकेटमध्ये फिनिशरच्या रुपात आपली खास छाप सोडणारा रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज या जोडीनं नुकताच साखरपुडा उरकून घेतला आहे. रविवारी ८ जूनला लखनौ येथील द सेंट्रम हॉटेलमध्ये मोजक्या आणि प्रतिष्ठित मंडळींच्या साक्षीनं हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला दोन्ही कुटुंबियातील मंडळींसह क्रिकेट आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पांढऱ्या अन् गुलाबी रंगाची गोडी, एकमेकांना शोभून दिसत होती रिंकू अन् सरोज यांची जोडी
सेलिब्रेटी मंडळींचा साखरपुडा म्हटलं की, लूकची चर्चाही होतेच. रिंकू सिंह आणि प्रिया सरोज या जोडीनं साखरपुड्यातील लूकही एकदम परफेक्ट असा होता. यासाठी जोडीनं पांढऱ्या अन् गुलाबी आउटफिट्ससह परफेक्ट मॅचिंग केल्याचे पाहायला मिळाले. साखरपुड्याच्या सोहळ्या आधी या जोडीनं प्री वेडिंग फोटोशूटही केले. ते फोटही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
रिंकू सिंहची होणारी पत्नी खासदार, किती आहे तिची संपत्ती...; डोळ्यांवर विश्वास बसणार नाही...
या कार्यक्रमासाठी सुरक्षा व्यवस्थाही अगदी कडक ठेवण्यात आली होती. फक्त बारकोड केलेले पास असलेल्या पाहुण्यांनाच कार्यक्रमासाठी प्रवेश दिला जात होता. व्हीआयपी उपस्थितांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी पोलिसांसह खाजगी सुरक्षा कर्मचाऱ्यांचा ताफाही यावेळी सतर्क असल्याचे पाहायला मिळाले.