क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics

साखरपुड्याच्या सोहळ्या आधी या जोडीनं प्री वेडिंग फोटोशूटही केले. ते फोटही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 14:38 IST2025-06-08T14:31:10+5:302025-06-08T14:38:36+5:30

whatsapp join usJoin us
Indian Cricketer Rinku Singh Get Engaged To Samajwadi Party MP Priya Saroj In Lucknow See Viral Pics | क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics

क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Cricketer Rinku Singh Get Engaged To MP Priya Saroj In Lucknow : भारतीय क्रिकेटमध्ये फिनिशरच्या रुपात आपली खास छाप सोडणारा रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज या जोडीनं नुकताच साखरपुडा उरकून घेतला आहे. रविवारी ८ जूनला लखनौ येथील द सेंट्रम हॉटेलमध्ये मोजक्या आणि प्रतिष्ठित मंडळींच्या साक्षीनं हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला दोन्ही कुटुंबियातील मंडळींसह क्रिकेट आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

पांढऱ्या अन् गुलाबी रंगाची गोडी,  एकमेकांना शोभून दिसत होती रिंकू अन् सरोज यांची जोडी

सेलिब्रेटी मंडळींचा साखरपुडा म्हटलं की, लूकची चर्चाही होतेच.  रिंकू सिंह आणि प्रिया सरोज या जोडीनं साखरपुड्यातील लूकही एकदम परफेक्ट असा होता. यासाठी जोडीनं पांढऱ्या अन् गुलाबी आउटफिट्ससह परफेक्ट मॅचिंग केल्याचे पाहायला मिळाले. साखरपुड्याच्या सोहळ्या आधी या जोडीनं प्री वेडिंग फोटोशूटही केले. ते फोटही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

रिंकू सिंहची होणारी पत्नी खासदार, किती आहे तिची संपत्ती...; डोळ्यांवर विश्वास बसणार नाही...


 
कार्यक्रमाच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त

या कार्यक्रमासाठी सुरक्षा व्यवस्थाही अगदी  कडक ठेवण्यात आली होती. फक्त बारकोड केलेले पास असलेल्या पाहुण्यांनाच कार्यक्रमासाठी प्रवेश दिला जात होता. व्हीआयपी उपस्थितांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी पोलिसांसह खाजगी सुरक्षा कर्मचाऱ्यांचा ताफाही यावेळी सतर्क असल्याचे पाहायला मिळाले.
 

Web Title: Indian Cricketer Rinku Singh Get Engaged To Samajwadi Party MP Priya Saroj In Lucknow See Viral Pics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.