Prithvi Shaw Got Engaged To Long Time Girlfriend Akriti Agarwal : बऱ्याच दिवसांपासून टीम इंडिया बाहेर असलेला भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. IPL च्या हंगामाला सुरुवात होण्याआधी या क्रिकेटरनं लाँगटाइम गर्लफ्रेंड आकृती अग्रवालसोबत साखरपुडा उरकला आहे. अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन खास फोटो शेअर करत क्रिकेटरनं आयुष्याच्या नव्या इनिंगची सुरुवात केल्याची गोष्ट शेअर केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पृथ्वी-आकृतीच्या प्रेमाचा बंध
मैदानावरील षटकारांपासून ते आयुष्यातील सुखद क्षणांपर्यंत... ही माझी सर्वात सुंदर इनिंग आहे, अशा शब्दांत पृथ्वीनं आपल्या पार्टनरवरील प्रेम दाखवून दिले आहे. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.
पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल बऱ्याच दिवसांपासून एकमेकांसोबत डेट करत होते. आकृती अग्रवाल ही सोशल मीडियावरील लोकप्रिय चेहऱ्यांपैकी एक आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या रुपात तिने आपला एक वेगळा चाहतावर्ग कमावला आहे. दोघांच्यात प्रेमाचा खेळ सुरु असल्याची चर्चा रंगत असताना गतवर्षी गणेशोत्सवाच्या दरम्यान पृथ्वी शॉनं पहिल्यांदा तिच्यासोबतचा पहिला फोटो शेअर केला होता. पारंपारिक अंदाजातील फोटोसह त्याने प्रेमाची जणू कबुलीच दिली होती.
मग शेअर केली तिच्यासोबतच्या भेटीमागची गोष्ट
प्रेमाची कबुली दिल्यावर पृथ्वी शॉनं सोशल मीडियावरील एका खास पोस्टसह प्रेम कसं फुललं यासंदर्भातील गोष्टही शेअर केल्याचे पाहायला मिळाले होते. God’s Plan असा उल्लेख करत क्रिकेटरनं गर्लफ्रेंडसोबतचे खास फोटो शेअर करत आयुष्यभरासाठी एकमेकांसोबत पार्टनरशिप फुलवण्यासाठी तयार असल्याची हिंट दिली होती. अखेर दोघांनी साखरपुडा उरकत आयुष्याच्या नव्या इनिंगचा नवा अध्याय सुरु केला आहे.