Rinku Singh Honeymoon Trip: आशिया कपमध्ये आजपासून भारतीय संघाचे आव्हान सुरू होणार आहे. त्यापूर्वी रिंकू सिंगचा एक पॉडकास्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रिंकू सिंगने या पॉडकास्टमध्ये अनेक मजेशीर गोष्टी सांगितल्या आहेत. तो असंही म्हणाला की एका भारतीय खेळाडूसोबत तो त्याच्या हनिमून ट्रिपवर सोबत गेला होता. हा खेळाडू म्हणजे, नितीश राणा. नितीश आणि रिंकू खूप चांगले मित्र आहेत. रिंकू सिंगने नेमकं काय सांगितलं, जाणून घेऊया.
रिंकूचा धमाल किस्सा
रिंकू सिंगने एक मनोरंजक किस्सा सांगितला. तो म्हणाला, "मी कधीही भारताबाहेर गेलो नव्हतो. तिथे लोक कसे राहतात, ते काय खातात, हे पाहायचे आणि त्यासाठी परदेशात जायचे हे माझे स्वप्न होते. नितीश राणाचे लग्न २०१९ मध्ये झाले. तो हनिमूनला युरोपला जाणार होता. तो मलाही घेऊन गेला. राहुल तेवतिया आणि मी त्यांच्यासोबत हनिमून ट्रिपवर गेलो होतो."
इंग्लिश बोलण्याची वेगळीच मजा
"नितीश राणा मला परदेशी लोकांशी कसे बोलायचे ते सांगत होता. रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर करायला शिकवत होता. मी इंग्रजीत वाक्ये कशी बनवायची याचा विचार करायचो. मी दुकानात गेल्यावर हातवारे करून ऑर्डर द्यायचो. मी इंग्रजी बोलू शकतो. मी रसेलशी बोलतो, पण हा आत्मविश्वासाचा खेळ आहे. आयपीएलमध्ये माझे इंग्रजी आपोआप बाहेर येते. पण तिथे मात्र घोळ होऊन गेला,' अशी मज्जा त्याने सांगितले.
इंग्रजी कोचिंग क्लासेस
"मला वाईट वाटते कारण मला छान इंग्रजी येत नाही. मी कुलदीप यादवसोबत न्यू यॉर्कला गेलो होतो, तिथे कुलदीपच ऑर्डर देत होता. त्याने मला विचारले की तू इंग्रजी कधी शिकशील. मी म्हणालो की मला त्यांचं बोलणं कळायला हवे, तिथेच गोंधळ होतो. मी इंग्रजीचे कोचिंगही घेतले, वण काहीही फायदा झालेला नाही," असेही तो म्हणाला.