Join us

सैनीच्या प्रेयसीने वडिलांना केले यकृतदान; पूजाच्या धैर्याला अनेकांचा सलाम...

क्रिकेटपटू नवदीप सैनी वेगवान चेंडू टाकण्यासाठी ओळखला जातो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 00:03 IST

Open in App

नवी दिल्ली : क्रिकेटपटू नवदीप सैनी वेगवान चेंडू टाकण्यासाठी ओळखला जातो. दिल्ली रणजी संघातून ताशी १५० किलोमीटर वेगाने गोलंदाजी करणाऱ्या नवदीपची टीम इंडियाला विश्वचषकासाठी गरज भासली होती. रोहित शर्मा, विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांना नेट्‌समध्ये गोलंदाजी करणारा नवदीप आता भारतीय संघाचा खेळाडू बनला.

वन डे आणि टी-२० प्रकारांत भारतीय संघात त्याला स्थान दिले जाते. नवदीपमध्ये विशेष टॅलेंट आहे. टीम इंडियाच्या या वेगवान गोलंदाजाची गर्लफ्रेंडही ‘खास’ आहे. रोहतकमध्ये जन्मलेल्या नवदीपच्या गर्लफ्रेंडचे नाव पूजा बिजारनिया असे आहे. सोशल मीडियावर नवदीप-पूजाच्या प्रेमाची जोरदार चर्चा रंगते.क्रिकेटपटूसोबतच्या मैत्रीमुळे चर्चा होणे तसे स्वाभाविक. यावेळी पूजा वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आली. तिच्या कृतीची अनेकांनी प्रशंसा केली. पूजाने आपल्या वडिलांचा जीव वाचविण्यासाठी स्वत:चे ५५ टक्के यकृत वडिलांना दान केले.

पूजाचे लिव्हर तिच्या वडिलांना ट्रान्स्प्लांट करणारे डॉ. रचित श्रीवास्तव यांनी मीडियाला ही माहिती दिली. या उपचारासाठी पूजा आणि तिच्या कुटुंबीयांना स्वत:ची संपत्ती विकावी लागली. अवयव दान करण्यासाठी अनेकजण धजावत नाहीत. पूजाने मात्र हसत-हसत आपल्या वकिलांना यकृत दान केले. अलीकडे नवदीप आणि पूजा आयपीएलदरम्यान एकत्र दिसले. दोघांनी विराट आणि अनुष्कासोबत छायाचित्रही काढले होते.

टॅग्स :बीसीसीआय