Indian Cricketer Mohammed Siraj And Mohammed Shami on Pahalgam Terror Attack : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर भारतीय क्रिकेटर्स मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. भारताच्या दोन्ही जलदगती गोलंदाजांनी All Eyes on Pahalgam असं लिहिलेल्या फोटोसह खास पोस्ट शेअर करत या घटनेचा निषेध व्यक्त केल्याचे दिसते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राक्षसी कृत्याला क्षमा नाही, सिराजनं अशा शब्दांत नोंदवला निषेध
मोहम्मद सिराज याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा एक फोटो शेअर केलाय. ज्यात ते मृतांना श्रद्धांजली वाहतानाना दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना सिराजनं लिहिलंय की, "पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याची घटना ही भयावह असून धर्माच्या नावाखाली निष्पाप नागरिकांवर निशाणा साधण्याचा हा प्रकार म्हणजे राक्षसी कृत्य आहे. कोणतीही विचारधारेला हे पटणार नाही. माणसाच्या जीवाची किंमत नसणारी ही कसली लढाई? असा प्रश्न उपस्थितीत करत सिराजने या घटनेचा निषेध व्यक्त केलाय. सिराज पुढे म्हणाला आहे की, या घटनेतील पीडितांच्या कुटुंबियावर झालेला आघात अन् दु:खाची कल्पनाही करता येणार नाही. त्यांना या दु:खातून सावरण्याचे बळ मिळो. हल्लेखोरांना शोधून दया-माया न दाखवता कठोर शिक्षा दिली जाईल, अशी आशाही त्याने व्यक्त केली आहे.
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
शमी म्हणाला ही, काळीज पिळवटून टाकणारी घटना!
Mohammed Shami on Pahalgam Terror Attack
मोहम्मद शमीनं इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून All eyes on pahalgam या पोस्टरसह या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटलं की. "पर्यटक दहशतवाद नाही तर सुंदरता आणि शांतीच्या शोधात येतात.पहलगाम येथे जे घडलेली घटना ही काळीज पिळवटून टाकणारी आहे. या अमानवीय घटनेतील पीडितांच्या कुटुंबियांसोबत आपण सर्व एकजूटीनं उभे राहुयात."