Join us

भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा संस्मरणीय ठरेल

भारतीय संघाने कसोटी मालिकेपाठोपाठ वन-डे मालिकेतही श्रीलंकेला क्लीन स्वीप दिल्यामुळे एकमेव टी-२० सामन्यात भारताला दावेदार मानले जात आहे. त्यामुळे हा दौरा भारतीय संघासाठी संस्मरणीय ठरणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 02:07 IST

Open in App

सुनील गावसकर लिहितात...भारतीय संघाने कसोटी मालिकेपाठोपाठ वन-डे मालिकेतही श्रीलंकेला क्लीन स्वीप दिल्यामुळे एकमेव टी-२० सामन्यात भारताला दावेदार मानले जात आहे. त्यामुळे हा दौरा भारतीय संघासाठी संस्मरणीय ठरणार आहे.भारतीय संघ श्रीलंकेच्या तुलनेत सरसच आहे. श्रीलंका सर्वोत्तम संघ खेळविण्यात यशस्वी ठरला असता तरी त्यांना भारताला पराभूत करताना संघर्ष करावा लागला असता. प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त, निलंबनाची कारवाई यामुळे श्रीलंका संघ या मालिकेत वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसला. श्रीलंका संघाला अनिश्चिततेच्या गर्तेतून बाहेर पडता आले नाही.मालिका विजयाचे श्रेय भारतीय संघाला द्यायलाच हवे. वन-डे क्रिकेटच्या तुलनेत टी-२० क्रिकेटमध्ये अधिक अनिश्चितता असते. काही चेंडूंमध्ये सामन्याचा निकाल बदलू शकतो. भारताचे प्रमुख खेळाडू कोहली व रोहित शर्मा यांचा फॉर्म लक्षात घेता अन्य खेळाडू केवळ सहकार्य करण्याची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे प्रथम फलंदाजी स्वीकारली किंवा लक्ष्याचा पाठलाग करण्याची वेळ आली तरी भारताला वर्चस्व गाजवण्याची संधी राहील. गोलंदाजही विशेषता वेगवान गोलंदाज बुमराह व भुवनेश्वर चांगल्या फॉर्मात आहेत. त्यामुळे श्रीलंका संघाला वर्चस्व गाजवण्याची संधी मिळणे सोपे नाही. अक्षर पटेल, कुलदीप यादव चांगला मारा करीत आहे. त्यामुळे श्रीलंका संघाचा मार्ग खडतर आहे. कसोटी व वन-डेच्या तुलनेत टी-२० लढत रंगतदार होईल, अशी आशा आहे. (पीएमजी)

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघक्रिकेट