Indian Cricket Team's Jersey For T20 World Cup : आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियान नव्या जर्सीत दिसणार आहे. बीसीसीआयनं शुक्रवारी त्याबाबतची घोषणा केली असून १३ ऑक्टोबरला टीम इंडियाच्या जर्सीचे अनावरण होणार अससल्याचे त्यांनी जाहीर केले. ''या क्षणाची आपण आतुरतेनं वाट पाहतोय!; १३ ऑक्टोबर होणाऱ्या मोठ्या घोषणेसाठी सज्ज व्हा,''असे बीसीसीआयनं ट्विट केलं.
MPL Sports हे टीम इंडियाचे अधिकृत किट स्पॉन्सर्स आहेत आणि डिसेंबर २०२३पर्यंत हा करार आहे. १९९२च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या जर्सीतून प्रेरणा घेत रेट्रो जर्सी खेळाडूंनी परिधान केली होती. आता त्यातही बदल होणार आहे. आता टीम इंडियाची ही नवी जर्सी फॅन्सनाही खरेदी करता येणार आहे. त्याचे प्री बुकींग सुरू झाले आहे. विराट कोहलीची स्वाक्षरी असलेली १८ क्रमांकाच्या जर्सीची किंमत १७९९ पासून सुरू होत आहे.
भारतीय संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी; राखीव खेळाडू - श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर व दीपक चहर
भारतीय संघाचे वेळापत्रक
२४ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
३१ ऑक्टोबर - भारत वि. न्यूझीलंड, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
३ नोव्हेंबर - भारत वि, अफगाणिस्तान, अबु धाबी, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
५ नोव्हेंबर - भारत वि. ब गटाती अव्वल, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
८ नोव्हेंबर - भारत वि. अ गटातील उपविजेता, दुबई, सायंकाळी ७.३० वाजता