Join us

Athiya Shetti : "जेव्हा मी खचून जातो तेव्हा...", पत्नी अथिया शेट्टीला शुभेच्छा देताना केएल राहुल भावूक

ICC ODI World Cup 2023 : भारतीय क्रिकेट संघ सध्या वन डे विश्वचषकात व्यग्र आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 15:07 IST

Open in App

भारतीय क्रिकेट संघ सध्या वन डे विश्वचषकात व्यग्र आहे. सलग आठ सामने जिंकून यजमान संघाने आपला विजयरथ कायम ठेवला असून सर्वत्र जल्लोषाचे वातावरण आहे. रविवारचा दिवस भारतीय संघासाठी खास होता. कारण या दिवशी भारताचा माजी कर्णधार आणि आघाडीचा फलंदाज विराट कोहलीचा वाढदिवस आणि त्यात किंग कोहलीने केलेली शतकी खेळी. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध मोठा विजय मिळवून भारताने विश्वचषकाच्या गुणतालिकेत आपले वर्चस्व राखले. खरं तर रविवारी किंग कोहलीसह अभिनेत्री आणि लोकेश राहुलची पत्नी अथिया शेट्टी हिचा देखील वाढदिवस होता. अथियाचा पती लोकेशने रोमॅंटिक अंदाजात पत्नीला वाढदिवशी शुभेच्छा दिल्या.

रविवारी अथियाने तिचा ३१ वा वाढदिवस साजरा केला. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी तिच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला. लोकेश राहुलने देखील पत्नीला शुभेच्छा देताना एक रोमॅंटिक पोस्ट शेअर केली. राहुलने सोशल मीडियावर एक पोस्ट करत अथिया शेट्टीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राहुलने खास शायराना अंदाज दाखवत पत्नीचे आभारही मानले.

"जेव्हा मी खचून जातो, तेव्हा तू मला साथ देऊन माझा आधार बनतेस... जेव्हा मी एकटा असतो, तेव्हा तू माझ्या अगदी जवळ असतेस. तू कुठेही असशील, तिथेच मी माझे घर म्हणतो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको... माझे तुझ्यावर प्रेम आहे", अशा शब्दांत राहुलने अथियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

टॅग्स :लोकेश राहुलअथिया शेट्टी सेलिब्रिटी