मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत विक्रमांचा पाऊस पाडण्यासाठी सज्ज झाला आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जेतेपद जिंकणारच, असा विश्वास चाहत्यांना आहे. कोहलीची प्रत्येक खेळी ही नव्या विक्रमाला गवसणी घालणारी असते. त्याच्या बॅटीतून चौकार-षटकारांची आतषबाजी पाहण्यासाठी सर्वच आतूर आहेत. पण, वर्ल्ड कप स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वीच कोहली करोडपती झाला आहे. आतापर्यंत एकाही क्रिकेटपटूला गाठता न आलेला 'विराट' टप्पा त्यानं गाठला आहे.
कोहली आणि धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये फरक काय, सांगतोय जाँटी रोड्सभारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सध्याचा कर्णधार विराट कोहली यांच्या कॅप्टन्सीवर बऱ्याच चर्चा होत आहेत. या दोघांच्या कॅप्टन्सीमध्ये नेमका काय फरक आहे, हे दक्षिण आफ्रिकेचा माजी महान क्रिकेटपटू जाँटी रोड्सने सांगितले आहे. याबाबत जाँटी म्हणाला की, " धोनी आणि कोहली या दोघांचे स्वभाव भिन्न आहेत. त्यामुळे त्यांची नेतृत्वशैलीही वेगळी आहे. धोनी हा चांगली रणनीती आखतो. समोरच्या खेळाडूची मानसीकता ओळखतो. त्यानुसार तो आपल्या संघातील खेळाडूंकडून कामगिरी करून घेतो. पण दुसरीकडे कोहली हा आपल्या कामगिरीच्या जोरावर छाप पाडण्याचा प्रयत्न करतो. कर्णधाराने स्वत: दमदार कामगिरी करून संघापुढे आदर्श निर्माण करावा, अशी कोहलीची शैली आहे."