"भविष्यातील पिढी भीतीशिवाय कशी जगू शकेल...", प्रदूषणावरून रोहितने व्यक्त केली चिंता

आयसीसी वन डे विश्वचषक आता अंतिम टप्प्याकडे कूच करत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 11:23 AM2023-11-02T11:23:43+5:302023-11-02T11:24:05+5:30

whatsapp join usJoin us
indian captain Rohit Sharma raises Mumbai air pollution issue and said, Important that our kids live without fear | "भविष्यातील पिढी भीतीशिवाय कशी जगू शकेल...", प्रदूषणावरून रोहितने व्यक्त केली चिंता

"भविष्यातील पिढी भीतीशिवाय कशी जगू शकेल...", प्रदूषणावरून रोहितने व्यक्त केली चिंता

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आयसीसी वन डे विश्वचषक आता अंतिम टप्प्याकडे कूच करत आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिल्या क्रमांकासाठी रस्सीखेच सुरू आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघ यंदाच्या पर्वातील आपला सातवा सामना खेळत आहे. श्रीलंकेविरूद्ध देखील विजय मिळवून गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वल स्थान गाठण्याचे आव्हान टीम इंडियासमोर असेल. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही आणि या सामन्यातही रोहितसेनेची नजर अपराजित राहण्यावर असेल. मात्र, या सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मानेप्रदूषणावरून चिंता व्यक्त केली.

भारतीय शहरांमधील खराब हवेच्या गुणवत्तेबद्दल चिंता व्यक्त करताना रोहितने विविध बाबींवर प्रकाश टाकला. तो म्हणाला की, सध्याची परिस्थिती चांगली नाही, भविष्यातील पिढी भीतीशिवाय कशी जगू शकेल हे महत्वाचे आहे. प्रत्येक हिवाळ्यात असे घडते. धुके आणि धुराचे प्राणघातक मिश्रण विश्वचषक सामन्यांचे आयोजन करणाऱ्या शहरांवर अर्थात मुंबई आणि दिल्लीवर परिणाम करते. खराब हवेच्या गुणवत्तेला अनेक बाबी कारणीभूत आहेत आणि BCCI ने त्यादृष्टीने पाऊल टाकले आहे. त्यामुळे दिल्ली आणि मुंबईतील उर्वरित विश्वचषक सामन्यांमध्ये फटाक्यांची आतषबाजी केली जाणार नाही. 

 रोहितने व्यक्त केली चिंता 
तसेच एवढ्या चांगल्या जगात अशी परिस्थिती कोणालाच नको आहे. पण, मला खात्री आहे की, अशी परिस्थिती टाळण्यासाठी संबंधित लोक आवश्यक पावले उचलतील आणि प्रदूषण रोखण्यास मदत करतील, असेही रोहितने यावेळी सांगितले. खरं तर दिल्लीतील हवेची गुणवत्ता बुधवारी सलग पाचव्या दिवशी ३७१ च्या AQI सह 'अत्यंत खराब' श्रेणीत राहिली. मुंबईतील प्रदूषणाची स्थिती देखील चिंताजनक आहे. 

दरम्यान, मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता खालावली आहे. याच कारणामुळे शहरातील हवा सुधारण्यासाठी बीसीसीआयने सामन्यानंतर फटाके फोडले जाणार नसल्याचे सांगितले. मुंबई शहरातील दाट धुक्यामुळे मुंबईकर त्रस्त आहेत. अशातच भारतीय कर्णधार रोहित शर्माने फ्लाइटमधून घेतलेला एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोत काहीही स्पष्ट दिसत नाही. रोहितने कॅप्शनच्या माध्यमातून म्हटले, "मुंबई शहराला काय झाले आहे?." 

Web Title: indian captain Rohit Sharma raises Mumbai air pollution issue and said, Important that our kids live without fear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.