Join us  

 भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, भारताला क्लीनस्वीप नोंदवण्यासाठी १३६ धावांचे आव्हान

तिसऱ्या टी-20 लढतीमध्ये श्रीलंकेने भारतासमोर विजयासाठी 136 धावांचे आव्हान ठेवले. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर भारतीय गोलंदाजांनी पाहुण्या लंकेच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2017 8:35 PM

Open in App

 - रोहित नाईक 

मुंबई - भारतीय गोलंदाजांनी केलेल्या अचूक माºयापुढे पुन्हा एकदा ढेपाळलेल्या श्रीलंकेने तिसºया आणि अखेरच्या टी२० सामन्यात निर्धारीत २० षटकात ७ बाद १३५ धावांची मजल मारली. जयदेव उनाडकट आणि हार्दिक पांड्या यांनी अप्रतिम मारा करताना श्रीलंका फलंदाजांची कोंडी केली. आता भारताने विजय मिळवण्यास यश मिळवले, तर भारताचा हा मुंबईमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय टी२० विजय ठरेल.   

वानखेडे स्टेडियमवर नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. सध्या संघाचा सुरु असलेला तुफान फॉर्म पाहता भारत पहिले फलंदाजी घेईल अशी अपेक्षा होती. परंतु, घरचे मैदान चांगल्या प्रकारे ओळखून असलेल्या रोहितने आपला निर्णय योग्य ठरवला. गोलंदाजांनी कर्णधाराच्या निर्णयाचा योग्य सन्मान करताना नियंत्रित मारा करत श्रीलंकेची कोंडी केली. श्रीलंकेची आघाडी फळी आक्रमक फटके मारण्याच्या प्रयत्नात लागोपाठ बाद झाल्याने त्यांचा अर्धा संघ ११.४ षटकात केवळ ७२ धावांत परतला होता. यामुळे इतर खेळाडूंवर कमालीचे दडपण आले. 

जयदेव उनाडकटने आपल्या पहिल्याच षटकात बळी घेत श्रीलंकेच्या फलंदाजीला सुरुंग लावला. यानंतर सर्वात युवा भारतीय म्हणून पदार्पण केलेल्या वॉशिंग्टननेही ‘सुंदर’ मारा करत आंतरराष्ट्रीय टी२० मधील पहिला बळी मिळवला. पहिल्या ६ षटकांमध्येच श्रीलंकेची ३ बाद ३७ अशी अवस्था करुन यजमानांनी सामन्यावर मजबूत पकड मिळवली. श्रीलंकेने आपले अर्धशतक ४५ चेंडूंमध्ये पूर्ण केले. 

 निरोशन डिकवेला (१), उपुल थरंगा (११), कुशल परेरा (४), सदीरा समरविक्रमा (२१), दानुष्का गुणथिलका (३) आणि कर्णधार थिसारा परेरा (११) असे सर्वच प्रमुख फलंदाज झटपट परतल्याने श्रीलंकेची बिकट अवस्था झाली होती. केवळ असेला गुणरत्ने याने एकाकी झुंज देताना ३७ चेंडूत ३ चौकारांसह ३६ धावांची झुंजार खेळी केली. अखेरच्या क्षणी दासुन शनाका (२९*) याने दोन षटकारांसह फटकेबाजी केल्याने श्रीलंकेला समाधानकारक धावसंख्या गाठण्यात यश आले. 

त्याचवेळी, भारताच्या प्रत्येक गोलंदाजाने अप्रतिम मारा करताना बळी घेण्यात यश मिळवले. उनाडकटने १५ धावांच्या मोबदल्यात २, तर हार्दिकने २५ धावांत २ बळी घेतले. 

.......................................

 

धावफलक :

श्रीलंका : निरोशन डिकवेला झे. सिराज गो. उनाडकट १; उपुल थरंगा झे. हार्दिक गो. उनाडकट ११, कुशल परेरा झे. व गो. सुंदर ४, सदीरा समरविक्रमा झे. कार्तिक गो. हार्दिक २१, असेला गुणरत्ने ३६, दानुष्का गुणथिलका झे. हार्दिक गो. कुलदीप ३, थिसारा परेरा झे. रोहित गो. सिराज ११, दानुष्का शनाका नाबद २९, अकिला धनंजय नाबाद ११. अवांतर - ८. एकूण : २० षटकात ७ बाद १३५ धावा.

गोलंदाजी : वॉशिंग्टन सुंदर ४-०-२२-१; जयदेव उनाडकट ४-०-१५-२; मोहम्मद सिराज ४-०-४५-१; हार्दिक पांड्या ४-०-२५-२; कुलदीप यादव ४-०-२६-१.  

टॅग्स :क्रिकेटभारतीय क्रिकेट संघमुंबई