Join us  

टीम इंडियाच्या गोलंदाजाच्या बहिणीचा भोजपुरी गाण्यावर डान्स, Video Viral

BTech केल्यानंतर तिनं मॉडलिंगचं क्षेत्र निवडलं. 2014मध्ये मिस इंडिया उत्तर विभागात ती उपविजेती होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 11:00 AM

Open in App

भारतीय संघाचा गोलंदाज दीपक चहर आपल्या स्विंग गोलंदाजीनं प्रसिद्ध आहे. त्यानं अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज आहे. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यानं बांगलादेशविरुद्ध हॅटट्रिक घेताना 3.2 षटकांत 7 धावांत 6 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. ट्वेंटी-20 क्रिकेटमधील ती सर्वोत्तम कामगिरी आहे. पण, दीपक चहर आता त्याच्या कामगिरीमुळे नाही,तर बहिण मालतीमुळे चर्चेत आला आहे. मालतीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दीपकची बहिण एक मॉडल आणि अॅक्टर आहे. आयपीएल सामन्यात अनेकदा तिला पाहिलं गेलं आहे. चेन्नई सुपर किंग्स हा तिचा आवडता संघ आहे आणि ती महेंद्रसिंग धोनीची फॅन आहे. तिनं धोनीसोबत फोटोही घेतला आहे. लखनौमध्ये BTech केल्यानंतर तिनं मॉडलिंगचं क्षेत्र निवडलं. 2014मध्ये मिस इंडिया उत्तर विभागात ती उपविजेती होती. त्याच वर्षी तिला एका अॅडची ऑफर मिळाली होती.  

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत मालती भोजपूरी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हे गाणं अश्लिल आहे, हे कदाचित तिला माहित नसावं. अनेकांनी कमेंटमधून तिला हे सांगण्याचा प्रयत्नही केला आहे.

पाहा व्हिडीओ...दीपक चहरचा विश्वविक्रमआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारे भारतीय  कसोटी - हरभजन सिंग, इरफान पठाणवन डे - चेतन शर्मा, कपिल देव, कुलदीप यादव आणि मोहम्मद शमीट्वेंटी-20- दीपक चहर ट्वेंटी-20त हॅटट्रिक घेणारा पहिला भारतीयश्रीलंकेच्या अजंथा मेडिंसचा 8 धावांत 6 विकेट घेण्याचा विक्रम मोडला6/7 - दीपक चहर वि. बांगलादेश, 20196/8 - अजंथा मेंडिस वि. झिम्बाब्वे, 20126/16- अजंथा मेंडिस वि. ऑस्ट्रेलिया, 20116/25 - युजवेंद्र चहल वि. इंग्लंड, 2017

रणजी करंडक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात दीपक चहरनं 10 धावांत 8 विकेट्स घेतल्या होत्या ( हैदराबाद)  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

नशीबाचं चक्र फिरलं; आजारी वडिलांना घेऊन 1200 किमी प्रवास करणाऱ्या ज्योतीसाठी आनंदवार्ता

... तर सचिनने 1.30 लाख धावा केल्या असत्या; विराटची त्याच्याशी तुलना चुकीची - शोएब अख्तर 

Video : दहा दिवसांचा पंतप्रधान बनवल्यास काय करशील? शाहिद आफ्रिदीनं सांगितली दोन टार्गेट!

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघसोशल व्हायरल