Join us

Sachin Tendulkar Saves Bird Life : सचिन तेंडुलकरने वाचवले जखमी पक्ष्याचे प्राण; नेटिझन्सना आवडला Viral Video

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) क्रिकेटमधून जरी निवृत्त झाला असला तरी आजही तो अनेकांची मनं जिंकतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 16:46 IST

Open in App

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) क्रिकेटमधून जरी निवृत्त झाला असला तरी आजही तो अनेकांची मनं जिंकतोय. सोशल मीडियावर सातत्याने सक्रीय असलेल्या सेलिब्रेटींपैकी तेंडुलकर हा एक आहे आणि त्यानं नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.  त्यात त्यानं जखमी झालेल्य पक्ष्याचे प्राण वाचवले आहे. 

शुक्रवारी त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यात त्याच्या हातात जखमी पक्षी दिसत आहे. कोणत्यातरी समुद्रकिनाऱ्यावरील हा व्हिडीओ आहे आणि तो पक्षी तेंडुलकरला किनाऱ्यावर सापडला. त्याने त्याला अलगद उचलले आणि नजिकच्या रेस्ट्राँमध्ये घेऊन गेला. तेथे त्याने कर्मचाऱ्याला पक्ष्याला काहीतरी खायला आणण्यास सांगितले. त्याने लिहिले की, थोडीशी काळजी आणि आपुलकीने आपले जग आणखी सुंदर बनू शकते. 

पाहा व्हिडीओ...

 
टॅग्स :सचिन तेंडुलकर
Open in App