भारतीय क्रिकेटपटू शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि त्यांची पत्नी मित्ताली परुळकर (Mittali Parulkar) या जोडीनं आई-बाबा झाल्याची गोड बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. रविवार, २१ डिसेंबर २०२५ रोजी मित्तालीन एका मुलाला जन्म दिला. दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भावनिक पोस्ट शेअर करत यासंदर्भातील माहिती दिली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आमचं ते गुपित अखेर आज जगासमोर आलं!
या जोडीनं इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एका फोटोसह खास कॅप्शन शेअर करत घरी आलेल्या नव्या पाहुण्याचं स्वागत केलं आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, “पालकत्वाच्या भावनेनं हृदयात अलगद जपलेलं आमचं एक स्वप्न… ते गुपित अखेर आज जगासमोर आलं आहे. आमच्या गोंडस मुलाचं स्वागत. ९ महिन्यांच्या सुंदर काळात मनात साठवलेलं आणि हळुवारपणे जपलेलं स्वप्न.” असा उल्लेख या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. खास शब्दांत जोडीनं पालकत्वाचा आनंद व्यक्त केल्यामुळे त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसते.
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
२०२३ मध्ये लग्न बंधनात अडकली होती जोडी
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू टीम इंडियाबाहेर आहे. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाच्या नेतृत्वाची मोठी जबाबदारी तो सांभाळताना दिसत आहे. आगामी आयपीएल स्पर्धेत तो पुन्हा एका मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळताना दिसणार आहे. त्याची पत्नी मित्तालीबद्दल बोलायचं तर ती एक यशस्वी उद्योजिका आहे. सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रीय असते. नोव्हेंबर २०२१ मध्ये साखरपुडा उरकल्यावर फेब्रुवारी २०२३ मध्ये ही जोडी लग्नबंधनात अडकली होती.
"बचपन का प्यार..."
शार्दुल आणि मित्ताली दोघांची लव्हस्टोरी एकदम खास आहे. बालपणीपासूनच ते एकमेकांना ओळखत होते. अतूट मैत्रीचं हळूहळू प्रेमात रुपांतर झालं अन् दोघांनी आयुष्यभरासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. शार्दुल ठाकूर हा क्रिकेटच्या माध्यमातून तगडी कमाई करणाऱ्या क्रिकेटरपैकी एक आहे. पण त्याची पत्नी मित्ताली हीची ओळख फक्त क्रिकेटरची बायको एवढ्या पुरती मर्यादीत नाही. ती एका बेकरीची मालकीण आहे. स्वतंत्र व्यवसायातून तगड्या कमाईसह तिने आपली स्वत:ची एक वेगळी ओळखही निर्माण केली आहे.