Join us

भारत ‘अ’च्या विजयात विहारी, रहाणेची चमक

कर्णधार अजिंक्य रहाणे(९१), हनुमा विहारी(९२) आणि श्रेयस अय्यर (६५) यांच्या अर्धशतकी खेळीपाठोपाठ गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारतीय ‘अ’ संघाने दुसऱ्या अनधिकृत वन डे सामन्यात शुक्रवारी इंग्लंड लॉयन्स (अ संघ) संघाचा १३८ धावांनी पराभव करीत पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी संपादन केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 05:54 IST

Open in App

त्रिवेंद्रम : कर्णधार अजिंक्य रहाणे(९१), हनुमा विहारी(९२) आणि श्रेयस अय्यर (६५) यांच्या अर्धशतकी खेळीपाठोपाठ गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारतीय ‘अ’ संघाने दुसऱ्या अनधिकृत वन डे सामन्यात शुक्रवारी इंग्लंड लॉयन्स (अ संघ) संघाचा १३८ धावांनी पराभव करीत पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी संपादन केली आहे.भारताने प्रथम फलंदाजी करीत ५० षटकात ६ बाद ३०३ धावा उभारल्या. इंग्लंड लॉयन्स संघाला त्यांनी ३७.४ षटकात १६५ धावात गुंडाळले. भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर अनमोलप्रितसिंग(७) लवकर बाद झाला. रहाणे- विहारी यांनी मात्र दुसºया गड्यासाठी १८१ धावांची भागीदारी केली. आक्रमक खेळणाºया विहारीने ८३ चेंडूत आठ चौकार आणि चार षटकार ठोकले. रहाणेने ११७ चेंडू टोलवून प्रत्येकी चार चौकार आणि षटकार मारले.विहारी बाद झाल्यानंतर खेळपट्टीवर आलेल्या श्रेयस अय्यरने ४७ चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकारांसह अर्धशतक गाठले.इंग्लंडकून अ‍ॅलेक्स डेव्हिस(४२ आणि ग्रेगरी(३९) यांचा अपवाद वगळता एकही फलंदाज धावा काढू शकला नाही. मयंक मार्कंडेय भारतासाठी सर्वांत यशस्वी ठरला. त्याने ८.४ षटकात ३२ धावात तीन गडी बाद केले. शर्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. दीपक चाहर, सिद्धार्थ कौल आणि विहारी यांनीही एकेक गडी बाद केला. मालिकेतील तिसरा सामना २७ जानेवारी रोजी होईल. (वृत्तसंस्था)

टॅग्स :अजिंक्य रहाणे