Join us  

टीम इंडियाची पहिल्या वन डेत न्यूझीलंडवर मात; पृथ्वी शॉ, संजू सॅमसनची फटकेबाजी

टीम इंडियाच्या वन डे संघात पदार्पण करण्यासाठी उत्सुक असलेल्या पृथ्वी शॉची बॅट न्यूझीलंड दौऱ्यावर चांगलीच तळपत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 1:03 PM

Open in App

टीम इंडियाच्या वन डे संघात पदार्पण करण्यासाठी उत्सुक असलेल्या पृथ्वी शॉची बॅट न्यूझीलंड दौऱ्यावर चांगलीच तळपत आहे. मंगळवारी पृथ्वीच्या अशाच फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियानं दणदणीत विजयाची नोंद केली. यावेळी पृथ्वीला यष्टिरक्षक संजू सॅमसनची तोलामोलाची साथ लाभली. भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यातल्या अनऑफिशीयल सामन्यात पाहुण्यांनी 5 विकेट राखून विजय मिळवला.

न्यूझीलंड अ संघांन प्रथम फलंदाजी करताना 230 धावा केल्या. राचीन रवींद्र ( 49) आणि कर्णधार टॉम ब्रुस ( 47) यांनी न्यूझीलंड अ संघाकडून दमदार खेळी केली. भारताच्या मोहम्मद सिराजनं सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. त्याला खलील अहमद आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत चांगली साथ दिली.

0भारत अ संघानं 29.3 षटकांत 231 धावांचे लक्ष्य पार केले. पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल यांनी दमदार खेळी केली. जिमी निशॅमनं भारत अ संघाला धक्का दिला. पृथ्वीनं 35 चेंडूंत 5 चौकार व 3 षटकार मारून 48 धावा केल्या. मयांकही 29 धावा करून बाद झाला. त्यानंतर कर्णधार शुबमन गिल ( 30), संजू सॅमसन ( 39), सूर्यकुमार यादव ( 35) आणि विजय शंकर ( 20*) यांनीही फटकेबाजी केली. संजूनं 21 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकार खेचून 39 धावा केल्या.

शिखर धवनची दुखापत गंभीर, प्रदीर्घ कालावधीपर्यंत राहणार क्रिकेटपासून दूर

India vs New Zealand : न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाचा वन डे संघ जाहीर, युवा खेळाडूला पदार्पणाची संधी

 

 

 

टॅग्स :पृथ्वी शॉभारत विरुद्ध न्यूझीलंड