Deepti Sharma World Record Most Wickets In Women's T20I : आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत नंबर वनचा ताज पटकवल्यानंतर आता दीप्ती शर्मानं आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. महिला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विश्व विक्रम तिने आपल्या नावे केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात निलाक्षी डि सिल्वाच्या रुपात एक विकेट घेत तिने या विक्रमाला गवसणी घातली. तिने या बाबतीत ऑस्ट्रेलियाची दिग्गज गोलंदाज मेगन शुट हिला मागे टाकले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टी-२० मध्ये अव्वल! आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये दीप्तीच्या खात्यात जमा आहेत एवढ्या विकेट्स
तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर दीप्ती शर्मानं नवा इतिहास रचला. या सामन्यात तिने ४ षटकांत २८ धावा देत १ विकेट घेतली. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या महिला गोलंदाजांच्या यादीत भारताची माजी जलदगती गोलंदाज झुलन गोस्वामी (३५५) आणि इंग्लंडच्या कॅथरीन सायव्हर ब्रंट (३३५) यांच्यानंतर दीप्ती शर्मा ३३४ विकेट्स घेत तिसऱ्या स्थानी आहे. इथंही ती आघाडीवर पोहचू शकते.
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम
दीप्ती शर्मा (भारत)
- सामने: १३३
- इकॉनॉमी: ६.१
- बळी: १५२
मेगन शुट (ऑस्ट्रेलिया)
- सामने: १२३
- इकॉनॉमी: ६.४
- बळी: १५१
हेन्रियेटा इशिम्वे (युगांडा)
- सामने: ११७
- इकॉनॉमी: ४.३
- बळी: १४४
निदा दार (पाकिस्तान)
- सामने: १६०
- इकॉनॉमी: ५.७
- बळी: १४४
सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड)
- सामने: १०१
- इकॉनॉमी: ६.०
- बळी: १४२