Join us  

WTC Final : अव्वल स्थानासह टीम इंडिया कसोटी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये; क्रिकेटच्या पंढरीत न्यूझीलंडशी भिडणार

ICC World Test Championship Final १८ जूनला लंडनमधील लॉर्ड्स मैदानावर भारत-न्यूझीलंड ( India vs New Zealand) असा अंतिम सामना रंगणार आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2021 4:06 PM

Open in App
ठळक मुद्दे५२० गुणांसह टीम इंडिया WTCच्या गुणतक्त्यात अव्वल स्थानीन्यूझीलंडच्या खात्यात ४२० गुण, इंग्लंड चौथ्या क्रमांकावर

भारतीय संघानं ( India vs England 4th Test) चौथ्या कसोटीत डावानं विजय मिळवला आणि इंग्लंडविरुद्धची मालिका ३-१ अशी जिंकली. या विजयाबरोबरच टीम इंडियानं आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद ( ICC World Test Championship) स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील प्रवेश निश्चित केला. १८ जूनला लंडनमधील लॉर्ड्स मैदानावर भारत-न्यूझीलंड ( India vs New Zealand) असा अंतिम सामना रंगणार आहे.  ICC World Test Championship Final from June 18th आर अश्विन, अक्षर पटेल यांचा 'पंच'; टीम इंडियाचा मालिकेत ३-१नं विजय ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतली आणि कसोटी मालिका रद्द करावी लागली. त्याचा फटका त्यांनाच बसला आणि आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद ( ICC World Test Championship) च्या अंतिम सामन्यासाठी भारत-इंग्लंड यांच्यातली मालिका उपांत्य फेरीचा सामना झाला. न्यूझीलंडनं आधीच अंतिम सामन्यात प्रवेश केल्यामुळे दुसऱ्या स्थानासाठी भारत, इंग्लंड यांच्यासोबत ऑस्ट्रेलियाही शर्यतीत राहिली. पण, ऑस्ट्रेलियाला अंतिम सामन्याचं तिकीट मिळवण्यासाठी भारत-इंग्लंड मालिकेच्या निकालावर अवलंबून राहवे लागले होते. पण, टीम इंडियानं चौथी कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियालाही बाहेर फेकले.

टीम इंडियाचा एक डाव व २५ धावांनी विजयIndia vs England, 4th Test : वॉशिंग्टन सुंदरच्या ( Washington Sunder) हुकलेल्या शतकानं सर्वांना वाईट वाटलं... ९६ धावांवर खेळत असताना समोर तीन फलंदाज होते, परंतु एकामागून एक तिघेही माघारी परतले. पण, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ( Narendra Modi Stadium) विजय मिळवून भारतानं मालिका ३-१ अशी खिशात घातली. इंग्लंडच्या पहिल्या डावातील २०५ धावांच्या प्रत्युत्तरात भारतानं ३६५ धावा करून १६० धावांची आघाडी घेतली. इंग्लंडचा दुसरा डाव आर अश्विन ( R Ashwin) आणि अक्षर पटेल ( Axar Patel) यांनी  १३५ धावांवर गुंडाळला. अक्षर पटेलनं ४८ धावांत पाच विकेट घेतल्या, आर अश्विननंही ४७ धावांत पाच बळी टिपले.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धान्यूझीलंड