इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेला २० जून २०२५ पासून सुरुवात होणार आहे. देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या तरुण खेळाडूंना भारतीय संघात संधी मिळाली. या मालिकेआधी इंग्लंडचा उपकर्णधार ऑली पोपने भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीबाबत मोठे वक्तव्य केले.
टॉकस्पोर्ट क्रिकेटशी बोलताना ऑली पोप म्हणाला की, "इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी भारताने संघ जाहीर केला आहे, यात बरेच युवा खेळाडू आहेत. पण हे प्रतिभावान खेळाडू आहेत. त्यांचा नवा कर्णधार शुभमन गिल एक हुशार खेळाडू आहे. परंतु, त्याला विराट कोहलीची कमतरता जाणवेल. भारतीय संघात अनेक चांगले खेळाडू आहेत. पण आमचे खेळाडू त्यासाठी सज्ज आहेत. भारतासोबत खेळण्यासाठी हा आमच्यासाठी उत्तम वेळ आहे. गेल्या उन्हाळ्यात आम्ही वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेसोबत खेळलो होतो.
इंग्लंडविरुद्ध विराटची कामगिरीविराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध २८ कसोटी सामन्यांमध्ये एकूण १९९१ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये ५ शतके आणि ९ अर्धशतकांचा समावेश आहे. इंग्लंडविरुद्ध त्याची सर्वोच्च धावसंख्या २३५ धावा आहे.
२००७ पासून इंग्लंडमध्ये एकही मालिका जिंकलेली नाहीभारताने २००७ पासून इंग्लंडमध्ये एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. २०११, २०१४ आणि २०१८ मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर, २०२१-२२ मालिका अनिर्णित राहिली होती. अशा परिस्थितीत, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया मालिका जिंकण्यासाठी उत्सुक असेल.