मुंबई : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी वर्ल्ड कपमध्ये खेळू नये, अशी देशवासियांची भावना होती. त्यानंतर बीसीसीआयनेदेखील आम्ही पाकिस्तानशी वर्ल्ड कपमध्ये सरकारच्या परवानगीशिवाय खेळू शकत नाही, असे आयसीसीला कळवले होते. पण आता आयसीसीनेबीसीसीआयला याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
आयसीसीने याबाबत आपले मत मांडताना सांगितले की, " आयसीसी कोणत्याही देशावर बहिष्कार टाकू शकत नाही. कारण हे निर्णय सरकार घेऊ शकते. हे माहिती असतानाही बीसीसीआयने आम्हाला याबाबत विचारणा केली होती, पण हा निर्णय घेणे आमच्या हातामध्ये नाही."
... तर भारत वर्ल्ड कपमध्ये पाकविरुद्ध खेळणार नाही - बीसीसीआय
पाकिस्तानातून दहशतवाद्यांना मिळत असलेले सहकार्य आणि त्यामुळे भारतावर सतत होणारे हल्ले यामुळे शेजारील राष्ट्राविरोधात देशात संतापाचे वातावरण आहेच. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर त्या संतापात अधिक भर पडली. त्यामुळे पाकिस्तानला जशासतसे उत्तर देण्याची भाषा देशवासीय करत आहेत. पाकिस्तानशी कोणतेही संबंध ठेवू नका, मग ते राजकीय असो, आर्थिक असो किंवा खेळाच्या मैदानावरील असो. पाकला धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ असल्याची भावना देशवासीयांत आहे. त्यामुळेच इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने पाकविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही ( बीसीसीआय) पाकविरुद्ध सामन्याबद्दल मोठं विधान केलं आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर तेथेही खेळण्याची गरज नाही अशी मागणी भारतात जोर धरत आहे. त्यावर बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की,'' वर्ल्ड कप स्पर्धा नजीक आल्यानंतर याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. या प्रकरणात आयसीसी काहीच करू शकत नाही. भारताने वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळू नये, असे सरकारला वाटत असेल तर आम्ही सामन्यावर बहिष्कार घालू.''
पाकिस्तानवर वर्ल्ड कप स्पर्धेत बंदी घालणे सोपी गोष्ट नाही - सौरव गांगुली
पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणून भारतीय क्रिकेट संघाने आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालावा, अशी मागणी होत आहे. भारताच्या माजी खेळाडूंनीही याला समर्थन दिले आहे. 14 फेब्रुवारीला झालेल्या या भ्याड हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पाकिस्तानवर वर्ल्ड कप स्पर्धेत बंदी घालावी अशी मागणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं यावर वेगळ मत व्यक्त केलं आहे. पाकिस्तानवर वर्ल्ड कप स्पर्धेत बंदी घालावी, यासाठी आयसीसीला राजी करणं सोपी गोष्ट नाही, असे गांगुली म्हणाला. बीसीसीआयच्या या मागणीला आयसीसीकडून परवानगी मिळण्याची एक टक्काही शक्यता नाही, असेही त्याने सांगितले.