Join us  

Big News : ICCची मोठी घोषणा, भारत दोन वर्ल्ड अन् चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे करणार आयोजन, पाकिस्तानलाही लॉटरी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीनं मंगळवारी २०२४ ते २०३१ या कालावधीतील ८ नव्या स्पर्धांची घोषणा केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 5:32 PM

Open in App

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीनं मंगळवारी २०२४ ते २०३१ या कालावधीतील ८ नव्या स्पर्धांची घोषणा केली. चार वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे पुनरागमन होणार आहे आणि पाकिस्तानला २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद मिळाले. याकालावधीत सहा वर्ल्ड कप व दोन चॅम्पिन्स ट्रॉफी स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.  अमेरिका, झिम्बाब्वे, नामिबिया, आयर्लंड आणि स्कॉटलंड या संघांनाही आयसीसी स्पर्धा आयोजनाचा मान मिळाला आहे. 

भारतानं २०११मध्ये संयुक्तपणे वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन केले होते आणि आता २०२६ व २०३१ मध्ये अनुक्रमे ट्वेंटी-२० व वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन करणार आहे. पाकिस्तानला २९ वर्षांनंतर आयसीसी स्पर्धा आयोजनाचा मान मिळाला आहे. १९९६मध्ये त्यांनी भारत व श्रीलंका यांच्यासह संयुक्तपणे वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन केले होते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमिझ राजा म्हणाले,आयसीसीच्या या निर्णयाचा मला किती आनंद होतोय हे शब्दात सांगणे अवघड आहे.  

जाणून घ्या कोणत्या देशांत होणार कोणती स्पर्धा

  • २०२४ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप - वेस्ट इंडिज आणि अमेरिका
  • २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी - पाकिस्तान
  • २०२६ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप - भारत आणि श्रीलंका
  • २०२७ वन डे वर्ल्ड कप - दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया
  • २०२८ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप-   ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड
  • २०२९ चॅम्पियन्स ट्रॉफी- भारत
  • २०३० ट्वेंटी-२० वर्ल्ड कप - इंग्लंड, आयर्लंड आणि स्कॉटलंड
  • २०३१ वन डे वर्ल्ड कप - भारत आणि बांगलादेश 

 

टॅग्स :आयसीसीबीसीसीआय
Open in App