Join us  

टीम इंडियाची T20 वर्ल्ड कपची तयारी जोरात; मालिकेत वेस्ट इंडिजवर केली मात

2020 वर्ष हे क्रिकेटच्या चाहत्यांसाठी पर्वणीचं वर्ष आहे...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 9:20 AM

Open in App

2020 वर्ष हे क्रिकेटच्या चाहत्यांसाठी पर्वणीचं वर्ष आहे... पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात महिला आणि पुरुष असे दोन ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघांची तयारी जोरात सुरू आहे. पण, यात टीम इंडियाही कुठे मागे नाही. भारताच्या पुरुष संघांप्रमाणे महिला संघही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत वर्चस्व गाजवत आहेत. भारताच्या महिला संघानं तर परदेशात उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली आहे. वन डे पाठोपाठ त्यांनी वेस्ट इंडिज दौऱ्यावर ट्वेंटी-20 मालिका जिंकण्याचाही पराक्रम केला. भारतीय महिलांनी गुरुवारी अखेरच्या ट्वेंटी-20 सामन्यात यजमान विंडीजला पराभवाची चव चाखवली. या विजयासह भारतीय महिलांनी पाच सामन्यांची मालिकेत 5-0 असे निर्भेळ यश मिळवले. 

प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघाने 3 बाद 134 धावा केल्या. शेफाली वर्मा ( 9) आणि स्मृती मानधना ( 7) या सलामीच्या जोडीला अपयश आल्यानंतर जेमिमा रॉड्रीग्ज आणि वेदा कृष्णमुर्ती यांनी टीम इंडियाला सावरले. या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. जेमिमानं 56 चेंडूंत 3 चौकारांसह 50 धावा केल्या, तर वेदानं 48 चेंडूंत 4 चौकारांच्या मदतीनं नाबाद 57 धावा चोपल्या. त्यांच्या खेळीच्या जोरावर भारतानं 3 बाद 134 धावा केल्या.

 

 त्यानंतर अनुजा पाटीलनं उत्तम गोलंदाजी करताना 3 षटकांत केवळ तीन धावांत विंडीजच्या दोन फलंदाजांना माघारी पाठवले. तिला राधा यादव, पूनम यादव, पूजा वस्त्राकर आणि हर्लीन देओल यांनी प्रत्येकी एक विकेट घेत उत्तम साथ दिली. विंडीजकडून किशोना नाइट ( 22) आणि शेमेन कॅम्प्बेल ( 19) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला. विंडीजला 7 बाद 73 धावांवर समाधान मानावे लागले. भारतानं 61 धावांनी हा सामना जिंकला.

 

टॅग्स :आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2020महिला टी-२० क्रिकेटभारतीय महिला क्रिकेट संघभारतवेस्ट इंडिज