Join us

IND Vs WI One Day : भारत-वेस्ट इंडिज सामना ब्रेबॉर्नवरच होणार; मुंबई क्रिकेट संघटनेला मोठा धक्का

लोढा समितीच्या नियमांनुसार मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये काही बदल करण्यात आले आणि त्यामुळे या सामन्याचा खर्च कसा करायचा, हा मोठा प्रश्न मुंबईसमोर उभा ठाकला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 15:24 IST

Open in App
ठळक मुद्देया सामन्यासाठी ब्रेबॉर्न स्टेडियमवर तिकिट विक्री सुरु आणि हे पाहिल्यावर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे रवी सावंत यांनी न्यायालयात धाव घेतली.

मुंबई, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : बीसीसीआयने भारत-वेस्ट इंडिजंमधील चौथा एकदिवसीय सामना वानखेडे मैदानावरच खेळवावा. हा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर होऊ नये, अशी याचिका मुंबई क्रिकेट असोसिएशनने न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी करण्यात आली असून हा सामना आता ब्रेबॉर्नवरच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

बीसीसीआयने चौथा एकदिवसीय सामना मुंबई क्रिकेट असोसिएशनला वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यासाठी दिला होता. पण लोढा समितीच्या नियमांनुसार मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये काही बदल करण्यात आले आणि त्यामुळे या सामन्याचा खर्च कसा करायचा, हा मोठा प्रश्न मुंबईसमोर उभा ठाकला होता.

मुंबई क्रिकेट संघटना खर्च करू शकणार नाही, हे बीसीसीआयला समजले तेव्हा त्यांनी हा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळण्याची तयारी सुरु केली. या सामन्यासाठी ब्रेबॉर्न स्टेडियमवर तिकिट विक्री सुरु आणि हे पाहिल्यावर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे रवी सावंत यांनी न्यायालयात धाव घेतली. पण ब्रेबॉर्न स्टेडियमवरील तिकिट विक्रीला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिज