Join us  

विश्वविक्रमाची बरोबरी करण्याची टीम इंडियाला संधी, इंग्लड, आॅस्टेÑलियाला गाठण्यासाठी विराट सेना उत्सुक

सध्या तुफान विजयी घोडदौड करीत असलेला भारतीय संघ एकामागून एक विक्रमांची मालिका गुंफत आहे. गेल्या ८ मालिकांमध्ये विराट सेनेने पराभवाची चव चाखलेली नसून केवळ विजयी धडाका कायम राखला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 1:11 AM

Open in App

नवी दिल्ली : सध्या तुफान विजयी घोडदौड करीत असलेला भारतीय संघ एकामागून एक विक्रमांची मालिका गुंफत आहे. गेल्या ८ मालिकांमध्ये विराट सेनेने पराभवाची चव चाखलेली नसून केवळ विजयी धडाका कायम राखला आहे. सध्या सुरु असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ १-० असे आघाडीवर आहे. नवी दिल्लीत होणारा मालिकेतील अंतिम सामना जिंकल्यास भारतीय संघ आणखी एक मालिका काबीज करेल, शिवाय यासोबत टीम इंडिया विश्वविक्रमाची बरोबरीही करेल.नागपूर येथे झालेल्या दुसरा कसोटी सामन्यात १ डाव व २३९ धावांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाने १-० अशी आघाडी घेतली. २ डिसेंबरपासून नवी दिल्लीत होणारा सामनाही भारताने जिंकल्यास, आॅस्टेÑलिया आणि इंग्लंडच्या नावावर असलेल्या मोठ्या विश्वविक्रमाची बरोबरी करण्यात विराट सेनेला यश येईल. भारताने दिल्ली काबीज करण्यात यश मिळवले, तर सलग नववी कसोटी मालिका जिंकण्यात टीम इंडिया यशस्वी होईल. याआधी अशी कामगिरी केवळ इंग्लंड आणि आॅस्टेÑलिया यांनीच केली आहे. इंग्लंडने १९८४ - १८९२ या दरम्यान सलग ९ कसोटी मालिका जिंकल्या होत्या. तसेच, आॅस्टेÑलियाने २००५ पासून २००७-०८ पर्यंत सलग ९ कसोटी मालिका विजयांचा पराक्रम केला होता.लंकेविरुद्धची मालिका जिंकून भारतीय संघाने या विक्रमाची बरोबरी केल्यास, आगामी जानेवारी महिन्यात होणाºया दक्षिण आफ्रिका दौºयात हा विक्रम मोडण्याची संधीही भारताकडे असेल. (वृत्तसंस्था)विराट कोहलीच्या नेतृत्त्वामध्ये भारतीय संघाने २०१५ साली लंकेविरुद्ध त्यांच्याच देशात बाजी मारत पहिला मालिका विजय मिळवला. यानंतर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका (३-०), वेस्ट इंडिज (२-०), न्यूझीलंड (३-०), इंग्लंड (४-०), बांगलादेश (१-०), आॅस्टेÑलिया (२-१) आणि श्रीलंका (३-०) असे शानदार विजय मिळवले. याआधी टीम इंडियाने २००८ ते २०१० सालादरम्यान सलग ५ कसोटी मालिका जिंकण्याची कमागिरी केली आहे.अपराजित राहण्याचे आव्हान....२ डिसेंबरपासून दिल्ली येथील फिरोझशाह कोटला स्टेडियमवर होणारा लंकेविरुद्धचा सामना भारतीय संघासाठी आव्हानात्मक असेल.कर्णधार कोहलीसाठी हे घरचे मैदान असून या मैदानावर भारतीय संघाने गेल्या ३० वर्षांत एकही कसोटी सामना गमावलेला नाही.त्यामुळे गेल्या ३० वर्षांपासून सुरु असलेली अपराजित मालिका कायम ठेवण्याचे आव्हान कोहली अ‍ॅण्ड कंपनीपुढे असेल.

टॅग्स :क्रिकेटभारतीय क्रिकेट संघभारतश्रीलंका