IND W vs AUS W: फक्त २५ धावांचे टार्गेट! जाता-जाता ऑस्ट्रेलियन कॅप्टनने टीम इंडियाला दिला मोठा धक्का

दिमाखदार विजयासह कॅप्टन एलिसानं कारकिर्दीतील शेवटही केला गोड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 15:52 IST2026-03-08T15:50:10+5:302026-03-08T15:52:44+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
India W vs Australia W Annabel Sutherland Took Six Wickets And Scored 129 Against Australia Thrashed India In The Pink Ball Test Alyssa Healy Farewell Game | IND W vs AUS W: फक्त २५ धावांचे टार्गेट! जाता-जाता ऑस्ट्रेलियन कॅप्टनने टीम इंडियाला दिला मोठा धक्का

IND W vs AUS W: फक्त २५ धावांचे टार्गेट! जाता-जाता ऑस्ट्रेलियन कॅप्टनने टीम इंडियाला दिला मोठा धक्का

Australia Women vs India Women, Only Test : ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक पिंक बॉल कसोटी सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाला अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आले. पर्थ येथील वेस्टर्न ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशन ग्राउंडवर  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकमेव कसोटी सामना खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाने तिसऱ्या दिवशीच भारतीय महिला संघाला १० विकेट्सनी पराभव करत कर्णधार एलिसा हिली (Alyssa Healy) हिला विजयी आणि अविस्मरणीय निरोप दिला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

...अन् ऑस्ट्रेलियाला मिळाले होते फक्त २५ धावांचे टार्गेट

पिंक बॉल टेस्टमध्ये पहिल्या डावात भारतीय संघाकडून जेमिमा रॉड्रिग्जच ८४ (५२) अर्धशतक वगळता एकाही बॅटरचा निभाव लागला नाही. परिणामी पहिल्या डावात भारतीय संघ १९८ धावांत ऑलआउट झाला होता. ॲनाबेल सदरलँड १२९ (१७१) आणि एलिसा ७६ (११६) दमदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात ३२३ धावा करत १२१ धावांची मोठी आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात भारतीय संघ १४९ धावांत आटोपल्यावर ऑस्ट्रेलियाला फक्त २५ धावांचे टार्गेट मिळाले होते. ऑस्ट्रेलियन सलामीच्या बॅटर्संनी पाचव्या षटकातच ते पार केले.  

भारत- न्यूझीलंड सामन्याआधी किवी गोलंदाजाचा कहर, ५ चेंडूत टिपल्या ५ विकेट्स!

प्रतिका-स्नेह राणामुळे मोठे संकट टळले, पण..

प्रतिका रावलने ६८ धावांच्या खेळीशिवाय स्नेह राणाने ३० धावांचे योगदान दिले. या दोघींनी अर्धशतकी भागीदारी केल्यामुळे भारतीय संघावरील डावाने पराभूत होण्याचे संकट टळले. पण शेवटी भारतीय संघावर तिसऱ्या दिवशीच पराभवाची नामुष्की ओढावली. ऑस्ट्रेलियाकडून लूसी हॅमिल्टन हिने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तीन सामन्यांची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली होती. पण त्यानंतर वनडे मालिकेतील ३-० अशा पराभवानंतर भारतीय संघाने एकमेव कसोटी मालिका तिसऱ्या दिवशीच गमावल्याचे पाहायला मिळाले. 

दिमाखदार विजयासह कॅप्टन एलिसानं कारकिर्दीतील शेवटही केला गोड 

 

ऑस्ट्रेलियाची दिग्गज खेळाडू एलिसा हिलीसाठी पिंक बॉल टेस्टही खास ठरली. याआधी तिने भारतीय संघाविरुद्धच्या   शतक साजरे करून वनडे कारकिर्दीतील सामना खास केला होता. त्यानंतर आता कसोटी क्रिकेटमधील शेवटच्या सामन्यातही तिने संघाला विजय मिळवून देत निरोपाचा सामना अविस्मरणीय केला.  सामना संपल्यावर ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडूंनी  कॅप्टन एलिसा हिली हिला खांद्यावर बसवून फेअरवेल दिल्याचा खास क्षणही पाहायला मिळाला. 
 

Web Title : पिंक बॉल टेस्ट में ऑस्ट्रेलिया महिला टीम ने भारत को हराया, हीली का विदाई

Web Summary : पिंक बॉल टेस्ट में ऑस्ट्रेलिया की महिला टीम ने भारत को 10 विकेट से हराया। सदरलैंड के शतक और हीली की पारी ने ऑस्ट्रेलिया की जीत तय की। भारत 198 और 149 रनों पर सिमट गया। हीली ने अपने अंतिम मैच में कप्तानी की और शानदार विदाई ली।

Web Title : Australia Women defeat India Women in Pink Ball Test, Healy farewells.

Web Summary : Australia Women defeated India Women by 10 wickets in the Pink Ball Test. Sutherland's century and Healy's innings set up Australia's win. India struggled, collapsing for 198 and 149. Healy captained her final match, ending her career on a high note.