IND vs WI 2nd T20 : रोहित शर्माने षटकारासह रचला विक्रम, कोहलीला टाकले पिछाडीवर

पहिल्या सामन्यात हिटमॅन रोहितला साजेशी कामगिरी करता आली नाही, परंतु दुसऱ्या सामन्यात त्याने ही कसर भरून काढली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 19:29 IST2018-11-06T19:29:21+5:302018-11-06T19:29:36+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
India vs WI 2nd T20 Live: Rohit Sharma made record with six, Virat Kohli is behind of him | IND vs WI 2nd T20 : रोहित शर्माने षटकारासह रचला विक्रम, कोहलीला टाकले पिछाडीवर

IND vs WI 2nd T20 : रोहित शर्माने षटकारासह रचला विक्रम, कोहलीला टाकले पिछाडीवर

ठळक मुद्देदुसऱ्या सामन्यात रोहितने षटकार लगावत एका विक्रमाला गवसणी घातली आहे.

कोलकाता, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज  : भारताचा कर्णधार रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात षटकार ठोकत एका विक्रमाला गवसणी घातली आहे.


पहिल्या सामन्यात हिटमॅन रोहितला साजेशी कामगिरी करता आली नाही, परंतु दुसऱ्या सामन्यात त्याने ही कसर भरून काढली. दुसऱ्या सामन्यात 11 धावा करताच रोहित विक्रमाच्या शिखरावर विराजमान होणार होता. दुसऱ्या सामन्यात रोहितने षटकार लगावत एका विक्रमाला गवसणी घातली आहे.



 

ट्वेंटी-20 सामन्यांत भारताकडून सर्वाधिक धावांचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. कोहलीने 62 सामन्यांत 2102 धावा केल्या आहेत. या सामन्यापूर्वी रोहित कोहलीपेक्षा 11 धावांनी पिछाडीवर होता. पण या सामन्यात 10 धावांवर असताना रोहितने षटकार लगावला आणि भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.



 

Web Title: India vs WI 2nd T20 Live: Rohit Sharma made record with six, Virat Kohli is behind of him