Join us  

India vs West Indies : विराट कोहलीची लै भारी खेळी; टीम इंडियानं मोडला दहा वर्षांपूर्वीचा विक्रम  

विराट कोहलीनं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम खेळी...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2019 1:09 PM

Open in App
ठळक मुद्देभारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत घेतली 1-0ने आघाडीविराट कोहली अन् लोकेश राहुलची अर्धशतकी खेळी

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात टीम इंडियानं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. वेस्ट इंडिजनं विजयासाठी ठेवलेलं 208 धावांचा लक्ष्य टीम इंडियानं 6 विकेट्स व 8 चेंडू राखून पार केलं. लोकेश राहुलच्या अर्धशतकी खेळीनंतर कर्णधार विराट कोहलीनं तुफान फटकेबाजी करताना नाबाद 94 धावा चोपून भारताला विजय मिळवून दिला. या विजयासह भारतीय संघानं दहा वर्षांपूर्वीचा स्वतःच्याच नावावरील विक्रम मोडला.

वेस्ट इंडिजनं प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 207 धावा केल्या. एव्हिन लुईसनं 17 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकार खेचून 40 धावांची खेळी केली. त्यानंतर ब्रेंडन किंग ( 31), शिमरोन हेटमायर ( 56) आणि किरॉन पोलार्ड ( 37) यांनी फटकेबाजी केली. जेसन होल्डरनही 9 चेंडूंत 24 धावा चोपल्या. युजवेंद्र चहलनं एकाच षटकात दोन धक्के देत विंडीजच्या धावगतीला चाप बसवला. 

त्यानंतर टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा (8) लगेच माघारी परतला. पण, राहुल व विराट यांनी शतकी भागीदारी केली. राहुलनं 40 चेंडूंत 5 चौकार व 4 षटकार खेचून 62 धावा केल्या. त्यानंतर विराटनं सर्व सूत्र आपल्या हाती घेताना विंडीजच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्यानं 50 चेंडूंत 6 चौकार व 6 षटकार खेचून नाबाद 94 धावा चोपल्या. भारतीय संघानं हा सामना 6 विकेट राखून जिंकला.

ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये भारताचा सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग208 वि. वेस्ट इंडिज, हैदराबाद 2019207 वि. श्रीलंका, मोहाली, 2009  202 वि. ऑस्ट्रेलिया, राजकोट, 2013199 वि. इंग्लंड, ब्रिस्टोल, 2018198 वि. ऑस्ट्रेलिया, सिडनी, 2016 

ट्वेंटी-20 क्रिकेटमधील विराटची सर्वोत्तम खेळी94* वि. वेस्ट इंडिज, हैदराबाद, 201990* वि. ऑस्ट्रेलिया, अॅडलेड, 2016 89* वि. वेस्ट इंडिज, मुंबई, 201682* वि. ऑस्ट्रेलिया, मोहाली, 201682 वि. श्रीलंका, कोलंबो, 2017   

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजविराट कोहलीवेस्ट इंडिजभारतीय क्रिकेट संघश्रीलंका