Join us

IND vs WI T20I : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या उर्वरित दोन सामन्यांवर अनिश्चिततेचं सावट; आज होणार फैसला

India vs West Indies T20I Series - भारत व वेस्ट  इंडिज यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेतील उर्वरित दोन सामने अमेरिकेत खेळवण्यात येणार आहेत, परंतु ६ व ७ ऑगस्टला होणाऱ्या या सामन्यांवर अनिश्चिततेची टांगती तलवार लटकत आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 18:03 IST

Open in App

India vs West Indies T20I Series - भारत व वेस्ट  इंडिज यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेतील उर्वरित दोन सामने अमेरिकेत खेळवण्यात येणार आहेत, परंतु ६ व ७ ऑगस्टला होणाऱ्या या सामन्यांवर अनिश्चिततेची टांगती तलवार लटकत आहे. चौथ्या सामन्याला तीन दिवस शिल्लक राहिले असूनही अमेरिकेकडून खेळाडूंना व्हीसा मिळालेला नाही. दोन्ही संघांतील काही खेळाडूंचा व्हीसा अद्याप अमेरिकेकडून मान्य केलेला नाही, त्यामुळे हे खेळाडू व्हीसा अपॉइंटमेंटसाठी गयानाला गेले आहेत.  

क्रिकेट वेस्ट इंडिजने दिलेल्या ताज्या वृत्तानुसार काही खेळाडू व्हीसाठी गयाना येथे गेले आहेत. तेथे ते अमेरिकन एम्बसीला भेट देणार आहेत. त्यांचा हा शेवटचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यास उर्वरित दोन सामन्यांसाठी दुसरा पर्यायाचा विचार केला जाईल. आता व्हीसा मिळाला तरी प्रवासाने खेळाडूंना थकवा जाणवू शकतो. आधीच व्यग्र वेळापत्रकामुळे खेळाडू दमले आहेत. त्यात मागील १६ तासांत खेळाडूंनी दोन सलग सामने खेळावे लागले. 

जर खेळाडूंना व्हीसा मिळाला, तर ते फ्लोरिडासाठी रवाना होतील. शनिवारी व रविवारी तेथे ट्वेंटी-२० सामने खेळवण्यात येणार आहेत. जर व्हीसा नाही मिळाला, तर हे सामने वेस्ट इंडिजमध्येच खेळवले जाण्याची शक्यता अधिक आहे.  

दरम्यान, काल झालेल्या तिसऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav) वादळी खेळी करून मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार पटकावला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत २० षटकांत ५ अर्धशतकं व १ शतक झळकावले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या आजच्या सामन्यातही त्याने  ४४ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकार खेचून ७६ धावा चोपल्या. त्याने अल्झारी जोसेफला मारलेला नाद खुळा शॉट सर्वांचे लक्ष वेधून गेला. भारताने हा सामना ७ विकेट्स राखून जिंकत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. वेस्ट इंडिजने विजयासाठी ठेवलेले १६५ धावांचे लक्ष्य भारताने ३ विकेट्स गमावून सहज पार केले. 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजव्हिसाअमेरिका
Open in App