Join us

India vs West Indies ODI : ...अन् जेव्हा क्रिस गेल आणि कोहली मैदानातच थिरकतात

भारत आणि वेस्ट इंडिज विरुद्ध गयाना येथे गुरुवारी होणारा पहिला वन डे सामना पावसामुळे अखेर रद्द करण्यात आला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 12:23 IST

Open in App

गयाना: भारत आणि वेस्ट इंडिज विरुद्ध गयाना येथे गुरुवारी होणारा पहिला वन डे सामना पावसामुळे अखेर रद्द करण्यात आला. त्यामुळे तीन सामनाच्या मालिकेतील पहिला सामना रद्द झाल्याने दुसरा वन डे सामना 11 ऑगस्टला पोर्ट ऑफ स्पेन येथे रंगणार आहे. 

परंतू या या सामना दरम्यान भारताचा कर्णधार विराट कोहली मैदानातील कर्मचारी सोबत नृत्य करताना दिसून आला. त्याच्यासोबत क्रिस गेल व केदार जाधव यांनी देखील कोहलीसोबत नृत्य करत या क्षणाचा आनंद घेतल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सामना सुरु होण्याच्या आधीपासूनच पाऊस सुरु होता. या कारणाने टॅास देखील उशीरा झाला. त्यानंतर भारताने टॅास जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतू त्यानंतर देखील तीनवेळा पावसाने खो घातल्याने शेवटी 13 षटकानंतरच पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. यावेळी वेस्ट इंडिजने 54 धावा करत 1 विकेट्स गमावली होती. 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजविराट कोहलीख्रिस गेल