India vs West Indies ODI : भारताचा वेस्ट इंडिज विरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द

भारत आणि वेस्ट इंडिज विरुद्ध गयाना येथे होणारा पहिला वन डे सामना पावसामुळे अखेर रद्द करण्यात आला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 11:55 IST2019-08-09T11:22:31+5:302019-08-09T11:55:29+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
India vs West Indies ODI: India's first match against West Indies canceled due to rain | India vs West Indies ODI : भारताचा वेस्ट इंडिज विरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द

India vs West Indies ODI : भारताचा वेस्ट इंडिज विरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द

गयाना: भारत आणि वेस्ट इंडिज विरुद्ध गयाना येथे गुरुवारी होणारा पहिला वन डे सामना पावसामुळे अखेर रद्द करण्यात आला. त्यामुळे तीन सामनाच्या मालिकेतील पहिला सामना रद्द झाल्याने दुसरा वन डे सामना 11 ऑगस्टला पोर्ट ऑफ स्पेन येथे रंगणार आहे. 

सामना सुरु होण्याच्या आधीपासूनच पाऊस सुरु होता. या कारणाने टॅास देखील उशीरा झाला. त्यानंतर भारताने टॅास जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच सामना सुरु होण्यास पावसामुळे विलंब झाल्याने 43 षटकांचा करण्यात आला. परंतू त्यानंतर देखील तीनवेळा पावसाने खो घातल्याने शेवटी 13 षटकानंतरच पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. यावेळी वेस्ट इंडिजने 54 धावा करत 1 विकेट्स गमावली होती. 

तसेच भारताचे गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांनी सुरुवातीपासूनच टिच्चून मारा केल्याने स्फोटक फलंदाज ख्रिस गेल 31 चेंडूत 4 धावाच करू शकला. त्यानंतर 11व्या षटकात कुलदिप यादवने गेलला स्वस्तात बाद करत पहिली विकेट्स घेतली. तसेच लुईसनं 36 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 40 धावा केल्या.

वन डेसाठी भारतीय संघ  - विराट कोहली ( कर्णधार),  रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के.एल. राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक),  रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी 

वन डेसाठी वेस्ट इंडिजचा संघ : जॉन कॅम्बेल, एव्हीन लुईस, शिमरोन हेटमायर, निकोलस पुरन, रोस्टोन चेस, फॅबियन अॅलन, कार्लोस ब्रॅथवेट, किमो पॉल, ख्रिस गेल, शेल्डन कॉट्रेल, ओशाने थॉमस, शे होप, जेसन होल्डर ( कर्णधार) केमार रोच.

Web Title: India vs West Indies ODI: India's first match against West Indies canceled due to rain