Join us
Daily Top 2Weekly Top 5

India vs West Indies : मोहम्मद शमीच्या जीवाला धोका, बंदुकधारी सुरक्षारक्षकाची मागणी

India vs West Indies:  पत्नी हसीन जहान हीच्यासोबतचा वाद इतका शिगेला पोहोचला आहे की, भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीला जीवाचा धोका वाटू लागला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 09:14 IST

Open in App

राजकोट, भारत विरुद्ध वेस्ट इंडीज :  पत्नी हसीन जहान हीच्यासोबतचा वाद इतका शिगेला पोहोचला आहे की, भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीला जीवाचा धोका वाटू लागला आहे. त्याने चक्क बंदुकधारी सुरक्षारक्षकाची मागणी केली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने तसा दावा केला आहे. शमी भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर होता आणि इशांत शर्मानंतर सर्वाधिक विकेट घेण्याचा पराक्रम त्याने त्या मालिकेत केला. गुरुवारपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तो कसून सराव करत आहे.

शमी आणि हसीन यांच्यात मार्च 2018 पासून वाद सुरू आहे. हसीनाने शमीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला होता. शमीने हे सर्व आरोप छोटे असल्याचे सांगितल्यानंतर हसीनने शमीवर मॅच फिक्सिंगचा आरोप केला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या लाचलुचपत विरोधी विभागाने तपासानंतर शमीला क्लिन चीट दिली. मात्र, या दामपत्यांमधील वाद अद्याप मिटलेला नाही. त्यामुळेच शमीने अम्रोहा येथील जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात बंदुकधारी सुरक्षारक्षकासाठी अर्ज पाठवला आहे. जिल्हा दंडाधिकारी हेमंत कुमार यांनी शमीला सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितल्या आहेत.

गेल्या महिन्यात हसीनने मुलगी अैराह हीचा देखभाल हक्काचा दावा गमावला. त्याशिवाय हसीनने मागितलेली दरमाह 10 लाखांची पोटगी न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायालयाने शमीला प्रतीमाह केवळ 80000 देण्यास सांगितले आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडीजमोहम्मद शामी