Join us
Daily Top 2Weekly Top 5

India vs West Indies : पहिल्याच सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड रचण्याची लोकेश राहुलला संधी

वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारत आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ पहिल्यांदा पुन्हा मैदानावर उतरणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 16:30 IST

Open in App

फ्लोरिडा, भारत वि. वेस्ट इंडिज : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आजपासून ट्वेन्टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या सामन्यात भारताच्या लोकेश राहुलला  वर्ल्ड रेकॉर्ड रचण्याची संधी आहे. पण हा वर्ल्ड रेकॉर्ड नेमका आहे तरी कोणता, ते जाणून घ्या...

वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारत आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ पहिल्यांदा पुन्हा मैदानावर उतरणार आहेत. विंडीज दौऱ्यावर दाखल झालेल्या भारताच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दौऱ्यात तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने होणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात आजपासून होणार आहे. येथे पहिला ट्वेंटी-20 सामना आज खेळवण्यात येणार आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटच्या इतिहासात रोहितच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत. त्यानं 94 सामन्यांत 32.37च्या सरासरीनं 2331 धावा केल्या आहेत. रोहितचा हा विक्रम कोहलीला मोडण्याची संधी आहे. दुसरीकडे राहुलकडे वर्ल्ड रेकॉर्ड रचण्याची नामी संधी आहे.

लोकेश राहुलला ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 1000 धावा करण्यासाठी 121 धावांची गरज आहे. या मालिकेत त्यानं पहिल्याच सामन्यात ही खेळी केल्यास ट्वेंटी-20त जलद 1000 धावा करण्याचा विश्वविक्रम त्याच्या नावावर होईल. त्यानं 24 डावांत 879 धावा केल्या आहेत. सध्या हा विक्रम पाकिस्तानचा बाबर आझमच्या ( 26 डाव) नावावर आहे. कोहलीनं 27 डावांत 1000 धावा केल्या आहेत.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजलोकेश राहुलविराट कोहलीरोहित शर्मा