Join us  

भारत विरुद्ध विंडीज इंदूर सामना आयोजन अधांतरी

...आता चेंडू बीसीसीआयच्या कोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2018 6:39 AM

Open in App

इंदूर : भारत आणि वेस्ट इंडिज संघांदरम्यान होळकर स्टेडियममध्ये २४ आॅक्टोबरला होणाऱ्या प्रस्तावित एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्याच्या भविष्याबाबत आता चेंडू बीसीसीआयच्या कोर्टात आहे. कारण मोफत तिकिटांच्या वादावर मध्य प्रदेश क्रिकेट संघटना (एमपीसीए) या लढतीच्या आयोजनाबाबत एक पाऊल मागे घेत असल्याचे दिसून येत आहे.

एमपीसीएचे सचिव मिलिंद कनमदीकर यांनी सांगितले की,‘आता वेळ फार कमी शिल्लक असल्यामुळे २४ आॅक्टोबरला भारत-विंडीज लढतीचे आयोजन अशक्य भासत आहे. लढतीच्या कार्यक्रमामध्ये बदल करण्याबाबत सध्यातरी बीसीसीआयकडून कुठली अधिकृत सूचना मिळालेली नाही आणि मोफत तिकिट वादाबाबतही आम्हाला कुठले स्पष्ट उत्तर मिळालेले नाही.’ दरम्यान, भारत-विंडीज एकदिवसीय सामन्याच्या प्रस्तावित यजमानपदाबाबत एमपीसीएची सध्याची भूमिका लक्षात घेता बीसीसीआयने ही लढत अन्य कुठल्या शहरात स्थानांतरित केली तर इंदूरच्या हजारो क्रिकेट चाहत्यांच्या पदरी निराशा येईल. हे चाहते या लढतीची प्रतीक्षा करीत आहेत. सेहवागचा दणकाविंडीज संघाने इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये आपला एकमेव एकदिवसीय सामना ८ डिसेंबर २०११ रोजी खेळला होता. त्या लढतीत तत्कालीन भारतीय कर्णधार वीरेंद्र सेहवागने २१९ धावांची आक्रमक खेळी करीत नवा विक्रम नोंदवला होता. सेहवागच्या या खेळीच्या जोरावर भारताने विंडीजचा १५३ धावांनी पराभव केला होता.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघवेस्ट इंडिज