Join us

India vs West Indies: मी परत येणार! पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात पाऊस बनू शकतो खलनायक

आज हैदराबादमध्ये पाऊस पडला. त्याचबरोबर उद्याही दिवसभरात हैदराबादमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 16:57 IST

Open in App

मुंबई : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातली ट्वेंटी-20 मालिका शुक्रवारपासून सुरू होत आहे. हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार आहे. पण या सामन्यामध्ये पाऊस हा खलनायक बनू शकतो, असे म्हटले जात आहे.

आज हैदराबादमध्ये पाऊस पडला. त्याचबरोबर उद्याही दिवसभरात हैदराबादमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पावसामुळे सध्याच्या घडीला वातावरण थोडं थंड असून त्याचा परीणाम खेळपट्टीवर होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.

खेळपट्टी जर पावसामुळे ओली झाली तर गोलंदाजांचा जास्त फायदा मिळू शकतो. पण दुसरीकडे पाऊस पडला तर त्याचे पाणी मैदानातून किती वेळा बाहेर काढले जाते, यावर सामना होणार की नाही, हे अवलंबून असेल. काहीवेळा पाऊस पडून गेल्यावर फक्त मैदानातून पाणी निर्धारीत वेळेत न काढल्यामुळे सामना रद्द करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

शुक्रवारी हैदराबादमध्ये धुसर दिसणार आहे. त्याचबरोबर सकाळी ११ ते रात्री ७ या वेळेमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या वेळेमध्ये ५ ते ७ टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या सामन्यातत पावसाचा व्यत्यय येऊ शकतो, असे म्हटले जात आहे.

बांगलादेशविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत टीम इंडियानं रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 2-1 असा विजय मिळवला. या मालिकेत रोहितनं आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत विराट कोहलीला मागे टाकून अव्वल स्थान पटकावलं. रोहितनं 101 सामन्यांत 2539 धावा केल्या आहेत. कोहली 72 सामन्यांत 2450 धावा केल्या आहेत. विराटला अव्वल स्थानावर पुन्हा कब्जा करण्यासाठी 89 धावांची गरज आहे. ट्वेंटी-20त कोहलीची सरासरी ही 50 इतकी आहे, तर रोहितनं 32.13च्या सरासरीनं धावा केल्या आहेत.

वेस्ट इंडिजचा वन डे संघः सुनील अ‍ॅब्रीस, शे होप, खॅरी पिएर, रोस्टन चेस, अल्झारी जोसेफ, किरॉन पोलार्ड ( कर्णधार), शेल्डन कोट्रेल, ब्रँडन किंग, निकोलस पूरण, शिम्रोन हेटमायर, एव्हिन लुईस, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, किमो पॉल, हेडन वॉल्श ज्युनियर. 

वेस्ट इंडिजचा ट्वेंटी-20 संघः फॅबियन अ‍ॅलेन, ब्रँडन किंग, डेनेस रामदिन, शेल्डन कोट्रेल, एव्हिन लुईस, शेरफान रुथरफोर्ड, शिमरोन हेटमायर, खॅरी पिएर, लेंडल सिमन्स, जेसन होल्डर, किरॉन पोलार्ड ( कर्णधार, हेडन वॉल्श ज्युनियर, किमो पॉल, निकोलस पूरण, केस्रीक विलियम्स.

विंडीज मालिकेचे वेळापत्रक⦁    ट्वेंटी-20 मालिका6 डिसेंबर - हैदराबाद8 डिसेंबर - तिरुवनंतपुरम11 डिसेंबर - मुंबई ⦁    वन डे मालिका15 डिसेंबर- चेन्नई18 डिसेंबर- विशाखापट्टणम22 डिसेंबर - कट्टक.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजविराट कोहलीरोहित शर्मा