Join us
Daily Top 2Weekly Top 5

India Vs West Indies : रोहित म्हणतो, मी फक्त टीम इंडियासाठी खेळत नाही, तर...

रोहितनं आतापर्यंत कोणतही विधान केलं नव्हतं, परंतु बुधवारी त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून स्वतःचं मत व्यक्त केलं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 09:31 IST

Open in App

मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यातील वादाच्याच चर्चा गेल्या आठवडाभर रंगल्या. पण, कॅप्टन कोहलीनं या सर्व वृत्ताचं खंडन करताना संघात ऑल इज वेल असल्याचे सांगितले. वेस्ट इंडिज दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी झालेल्या पत्रकारपरिषदेत कोहलीनं या अफवा असल्याचे स्पष्ट केले. या सर्व वादावर रोहितनं आतापर्यंत कोणतही विधान केलं नव्हतं, परंतु बुधवारी त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून स्वतःचं मत व्यक्त केलं.

रोहितने ट्विटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्याने म्हणटले की, मी केवळ संघासाठी नाही तर देशासाठी मैदानात उतरत असल्याचे त्याने स्पष्ट केले. 

वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या ट्वेंटी- 20 मालिकेसाठी भारतीय संघ अमेरिकेत दाखल झाला आहे. भारतीय संघाचा वर्ल्ड कपनंतरचा हा पहिलाच दौरा आहे. वर्ल्ड कप 2019मध्ये भारताच्या पराभवानंतर रोहित आणि विराट यांच्यात वादाला सुरुवात झाली होती. तसेच रोहितने विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला इंन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्यानंतर प्रसार माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्या होत्या. मात्र वेस्ट इंडिज दौऱ्याआधी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत विराटने सर्व आरोप फेटाळून लावले.

India Vs West Indies : टीम इंडियातील दुफळीवर प्रथमच कॅप्टन कोहलीनं मांडलं मत, म्हणाला...

रोहितने ट्विटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्याने म्हटले की, मी केवळ संघासाठी नाही तर देशासाठी मैदानात उतरतो.

टीम इंडिया वेस्टइंडीज विरुद्धच्या वन डे आणि दोन कसोटी सामन्यात शमीची निवड झाली आहे. टीम इंडिया तीन टी -20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे.

  • ट्वेंटी-20 मालिका

3 ऑगस्ट, पहिला सामना, फोर्ट लॉडेरहील, फ्लॉरिडा, रात्री 8 वा.पासून 4 ऑगस्ट, दुसरा सामना, फोर्ट लॉडेरहील, फ्लॉरिडा, रात्री 8 वा.पासून6 ऑगस्ट, तिसरा सामना, प्रोव्हीडन्स स्टेडियम, गयाना, रात्री 8 वा. पासून

  • वन डे मालिका

8 ऑगस्ट, पहिला सामना, प्रोव्हीडन्स स्टेडियम, गयाना, सायंकाळी 7 वा. पासून11 ऑगस्ट, दुसरा सामना, क्विन पार्क ओव्हल, त्रिनिदाद, सायंकाळी 7 वा.पासून14 ऑगस्ट, तिसरा सामना, क्विन पार्क ओव्हल, त्रिनिदाद, सायंकाळी 7 वा.पासून

  • कसोटी मालिका

22 ते 26 ऑगस्ट, पहिला सामना, सर व्हिव्हियन रिचर्ड स्टेडियम, अँटीग्वा, सायंकाळी 7 वा.पासून30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर, दुसरा सामना, सबीना पार्क, जमैका, रात्री 8 वा.पासून

 

टॅग्स :रोहित शर्माबीसीसीआयविराट कोहली