Join us
Daily Top 2Weekly Top 5

India vs West Indies : कसोटी मालिकेसाठी अजिंक्य रहाणेचा कसून सराव, पाहा व्हिडीओ

India vs West Indies: आशिया चषक स्पर्धेतील यशानंतर भारतीय संघ वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात दोन कसोटी, पाच वन डे आणि तीन ट्वेंटी-20 सामने होणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 09:37 IST

Open in App

मुंबई, भारत वि. वेस्ट इंडीज : आशिया चषक स्पर्धेतील यशानंतर भारतीय संघ वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात दोन कसोटी, पाच वन डे आणि तीन ट्वेंटी-20 सामने होणार आहेत. 4 ऑक्टोबरपासून कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे आणि त्यासाठी कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाऩे कसून सराव करत आहे.  

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताची मधली फळी सपशेल अपयशी ठरली होती. त्यामुळे भारतीय फलंदाजांच्या कमकुवत बाबी समोर आणल्या. त्यातून धडा घेत भारतीय फलंदाजांना वेस्ट इंडीजविरुद्ध कामगिरी सुधारण्याची संधी आहे. रहाणे हा संघाच्या मधल्या फळीतील प्रमुख खेळाडू आहे आणि त्याच्याकडून चांगल्या कामिगिरीची अपेक्षा आहे. त्यामुळे रहाणेने फलंदाजीचा कसून सराव केला. त्याने सरावाचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.   इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी मालिकेत रहाणेला 25.70 च्या सरासरीने केवळ 257 धावा करता आल्या होत्या. त्यात दोन अर्धशतकांचा समावेश होता. मात्र, विजय हजारे चषक स्पर्धेत त्याने मुंबईचे प्रतिनिधित्व करताना तीन सामन्यांत 230 धावा केल्या आहेत.    

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडीजअजिंक्य रहाणे