Join us

India vs West Indies 3rd T20: तिसऱ्या सामन्यातून रोहित शर्माला वगळले

विराटऐवजी या सामन्यात रोहित शर्माकडे कर्णधारपदाची सूत्रे सोपवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 20:49 IST

Open in App

गयाना, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारताचा फॉर्मात असलेला सलामीवीर रोहित शर्माला तिसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यातून वगळण्यात आले आहे. रोहितच्या जागी सलामीवीर म्हणून लोकेश राहुलला संघात स्थान देण्यात आले आहे.

 तिसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यावर पावसाचे सावट? काय सांगोतय हवामानाचा अंदाजभारतीय संघाने तीन सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या अखेरच्या सामन्यातही विजय मिळवण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे. पण या सामन्यावर पावसाचे सावट असल्याचे म्हटले जात आहे.

दुसऱ्या सामन्यातही पाऊस पडला होता. त्यामुळे वेस्ट इंडिजच्या संघाला 15 षटके फलंदाजी करता आली होती. पाऊस सातत्याने पडत असल्यामुळे हा सामना थांबवण्याचा निर्णय घेतला होता. डकवर्थ-लुईस नियमांनुसार या सामन्यात भारताला विजयी घोषित करण्यात आले होते. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात पाऊस पडणार का, हा प्रश्न साऱ्यांना पडलेला आहे.

तिसऱ्या सामन्यावरही पावासाचे सावट असल्याचे म्हटले जात आहे. हवामान खात्यानुसार मंगळवारी संपूर्ण दिवस पाऊस पडू शकतो. त्यामुळे तिसऱ्या सामन्यावर पावसाचे संकट असल्याचे म्हटले जात आहे.

भारताने मालिका आधीच खिशात घातल्यामुळे भारतीय संघ आजच्या सामन्यात काही बदल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात दीपक चहर, लोकेश राहुल. श्रेयस अय्यर, राहुल चहर यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.

राहुल कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो, पण आजच्या सामन्यात त्याचा सलामीसाठी विचार केला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत शिखर धवन किंवा रोहित शर्मा यांच्यापैकी एकाला विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. धवनला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही, त्यामुळे त्याच्याजागी राहुल खेळू शकतो. कर्णधार विराट कोहलीही विश्रांती घेण्यास प्राधान्य देईल. त्याच्याजागी श्रेयस अय्यर अंतिम अकरात एन्ट्री घेईल. 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजविराट कोहलीरोहित शर्मा