Join us  

India vs West Indies, 3rd ODI : टीम इंडियात दिसेल महत्त्वाचा बदल? तिसऱ्या सामन्यात अटीतटीची चुरस

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या वन डे मालिकेतील निर्णायक सामना रविवारी कटक येथे होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 4:50 PM

Open in App

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या वन डे मालिकेतील निर्णायक सामना रविवारी कटक येथे होणार आहे. वेस्ट इंडिजनं पहिला सामना जिंकून टीम इंडियाला धक्का दिला. पण, टीम इंडियानं दुसऱ्या सामन्यात दणदणीत विजय मिळवून मालिका बरोबरीत आणली. त्यामुळे तिसऱ्या व निर्णायक सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची टक्कर पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा प्रमुख गोलंदाज दीपक चहरला दुखापतीमुळे मालिकेतून माघार घ्यावी लागली आणि त्याच्या जागी नवदीप सैनी याला संघात स्थान देण्यात आले आहे.  दुसरा सामना मजेशीर झाला. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांची शतकी खेळी, रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांची फटकेबाजीनं टीम इंडियाला 5 बाद 387 धावांचा डोंगर उभा करून दिला. त्यानंतर विंडीजचे आघाडीचे फलंदाज झटपट माघारी परतले, परंतु शे होप आणि निकोलस पूरण यांनी केलेल्या जिगरबाज खेळीनं सामन्यातील रंजकता कायम ठेवली होती. पण, मोहम्मद शमीनं दिलेले दोन धक्के आणि त्यानंतर कुलदीप यादवच्या विक्रमी हॅटट्रिकनं सामना टीम इंडियाच्या झोळीत टाकला. भारतानं हा सामना 107 धावांनी जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी मिळवली. या सामन्यात कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या होत्या. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातला तिसरा सामना 22 डिसेंबरला कटक येथे होणार आहे. दीपक चहरने दुखापतीमुळे तिसऱ्या वन डेतून माघार घेतली आहे. त्याच्या जागी संघात नवदीप सैनीचा समावेश करण्यात आल्याची घोषणा, भारतीय क्रिकेट नियामक  मंडळानं ( बीसीसीआय) केली आहे. पण, रविवारी होणाऱ्या सामन्यात सैनीला अंतिम अकरामध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. शार्दूल ठाकूर आणि मोहम्मद शमी यांच्यावर जलदगती गोलंदाजीची जबाबदारी असेल. 

असा असेल संघरोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, शिवम दुबे, केदार जाधव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर.

 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजभारतीय क्रिकेट संघविराट कोहली