Join us

India vs West Indies, 2 nd test : आता व्हिडीओमध्ये काय बोलतोय हॅट्रिकवीर बुमरा, पाहा...

इतिहास रचल्यावर कर्णधार विराट कोहलीने बुमराची मुलाखत घेतली आणि बीसीसीआयने हा व्हिडीओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 20:31 IST

Open in App

किंगस्टन, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने हॅट्रिक नोंदवली आणि इतिहास रचला. हा इतिहास रचल्यावर कर्णधार विराट कोहलीने बुमराची मुलाखत घेतली आणि बीसीसीआयने हा व्हिडीओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे.

बुमराने वेस्ट इंडिजच्या सहा फलंदाजांना बाद केले, यामध्ये एका हॅट्रिकचा समावेश होता. यानंतर मुलाखतीमध्ये बुमराने एका व्यक्तीला या हॅट्रिकचे श्रेय दिले आहे. जर या व्यक्तीने मदत केली नसती तर हॅट्रिक होऊ शकली नसती, असे बुमराने म्हटले आहे. बुमरा नक्की व्हिडीओमध्ये काय म्हणाला ते ऐका...

पाहा हा खास व्हिडीओ

गेल्या सहा डावांमध्ये 'या' भारतीय खेळाडूने फोडला नाही भोपळाभारताने दुसऱ्या कसोटी सामन्यातही दमदार कामगिरी करत आपला वचक ठेवला आहे. पण भारताच्या संघात असा एक खेळाडू आहे की, त्याला गल्या सहा डावांमध्ये भोपळाच फोडता आलेला नाही. आता गेल्या सहा डावांमध्ये एकही धाव न करता आलेल्या संघात का ठेवले आहे, असा प्रश्न तुम्ही विचाराल. नेमका हा खेळाडू आहे तरी कोण...

आता वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्यांमध्येही त्याला आपले खाते उघडता आलेले नाही. सध्या सुरु असलेल्या सबिना पार्क स्टेडियममध्येही त्याला भोपळा फोडता आला नाही. हा फलंदाज आहे भारताचा मोहम्मद शमी. गेल्या सहा डावांमध्ये शमीला एकही धाव करता आलेली नाही. यापूर्वी हा लाजीरवाणा विक्रम भागवत चंद्रशेखर यांच्या नावावर होता. चंद्रशेखरदेखील सहा डावांमध्ये एकही धाव काढण्यात अपयशी ठरले होते.

पंचांनी नॉट आऊट दिल्यावरही झाली बुमराची हॅट्रिक; नेमका काय घोळ आहे...भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने दुसऱ्या कसोटी सामन्यात हॅट्रिक साजरी केली. पण यावेळी मैदानावरील पंचांनी फलंदाजाला आऊट दिले नव्हते, पण तरीही बुमराने ही हॅट्रिक साजरी केल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये गोलमाल नक्की आहे तरी काय...

या सामन्याच्या नवव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बुमराने डॅरेन ब्राव्होला लोकेश राहुलकरवी झेलबाद केले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर बुमराने ब्रुक्सला पायचीत बाद केले. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर बुमराने रोस्टन चेसविरुद्ध LBWची अपील केली. पण मैदानावरील पंचांनी चेसला नाबाद ठरवले होते. पण त्यानंतरही बुमराची हॅट्रिक झाली तरी कशी जाणून घ्या...

बुमराने चौथ्या चेंडूवर पंचांकडे दाद मागितली, पण त्यांनी चेस बाद नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर बुमरा कोहलीच्या दिशेने गेला. त्यावेळी बुमराने हा रीव्ह्यू घ्यायलाच हवा, असे त्याने कोहलीला सांगितले. त्यावेळी कोहलीने रीव्ह्यू घेतला. त्यानंतर तिसऱ्या पंचांनी चेस बाद असल्याचे जाहीर केले. 

टॅग्स :जसप्रित बुमराहविराट कोहलीभारत विरुद्ध वेस्ट इंडिज