India vs West Indies, 2 nd test : विंडीजनं 'ट्रम्प' कार्ड खेळलं; १४० किलोच्या खेळाडूला दिली संधी

वेस्ट इंडिज संघाने मालिका वाचवण्याच्या निर्धाराने दुसऱ्या कसोटीत ट्रम्प कार्ड खेळले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 09:15 PM2019-08-30T21:15:11+5:302019-08-30T21:16:01+5:30

whatsapp join usJoin us
India vs West Indies, 2nd Test: Heavywait Rahkeem Cornwall debut for west indies in 2nd Test against Team India | India vs West Indies, 2 nd test : विंडीजनं 'ट्रम्प' कार्ड खेळलं; १४० किलोच्या खेळाडूला दिली संधी

India vs West Indies, 2 nd test : विंडीजनं 'ट्रम्प' कार्ड खेळलं; १४० किलोच्या खेळाडूला दिली संधी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

किंगस्टन, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : वेस्ट इंडिज संघाने मालिका वाचवण्याच्या निर्धाराने दुसऱ्या कसोटीत ट्रम्प कार्ड खेळला. विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. पण त्यांनी या कसोटी सामन्यासाठी ६ फुट उंच आणि १४० किलो वजनाच्या खेळाडूला संघात स्थान देत टीम इंडियाला कोंडित पकडण्याचा डाव टाकला आहे. कोण आहे हा खेळाडू?

२६ वर्षीय रहकिम कोर्नोवॉल असे या खेळाडूचे नाव आहे. कसोटी मालिकेसाठी विंडीजने जाहीर केलेल्या संघात स्थान मिळाल्यापासून कोर्नवॉल चर्चेत होता. पण पहिल्या कसोटीत त्याला संधी देण्यात आली नव्हती. कामगिरीसह त्याच्या वजनाचीच चर्चा अधिक रंगली होती. पण आज अखेरीस त्याला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. 

ॲंटिग्वा येथे जन्मलेल्या कोर्नवॉलची उंची ६.५ फुट आहे आणि १४० किलो वजन आहे. कसोटी संघात दाखल होण्यापूर्वी कोर्नवॉलने आपल्या तंदुरुस्तीसाठी बरीच मेहनत घेतली. विंडीज संघाचे डॉक्टर आणि ट्रेनर त्याच्या तंदुरुस्तीवर लक्ष ठेवून होते.

कोर्नवॉलने स्थानिक क्रिकेटमध्ये छाप पाडली आहे. त्याने ९७ सामन्यांत २४.४३ च्या सरासरीनं २२२४ धावा केल्या आहेत. त्यात १ शतक व १३ अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय त्याने २६० विकेट्सही घेतल्या आहेत.

Web Title: India vs West Indies, 2nd Test: Heavywait Rahkeem Cornwall debut for west indies in 2nd Test against Team India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.